शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

भंवरलाल जैन यांच्या अंत्यदर्शनाला जनसागर

By admin | Published: February 27, 2016 2:08 AM

ठिबक सिंचनाची क्रांती घडविणारे, लाखो कुटुंबांचे पोशिंदा तथा जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत भंवरलाल जैन यांच्या अंत्यदर्शनासाठी शुक्रवारी सकाळपासूनच

जळगाव : ठिबक सिंचनाची क्रांती घडविणारे, लाखो कुटुंबांचे पोशिंदा तथा जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत भंवरलाल जैन यांच्या अंत्यदर्शनासाठी शुक्रवारी सकाळपासूनच देश-विदेशातील आप्तस्वकीयांची रीघ लागली होती. मुंबईतील जसलोक इस्पितळामध्ये गुरुवारी दुपारी त्यांचे निधन झाले. भाऊंच्या निधनाने शोकसागरात बुडालेल्या जळगावकरांसह मान्यवरांची पावले आपल्या लाडक्या कर्मयोग्याच्या अंत्यदर्शनासाठी जैन हिल्सकडे वळली. त्यात भाऊंच्या कामाचा केंद्रबिंदू असलेले शेतकरी, कष्टकरी यांचाही समावेश होता. (प्रतिनिधी)आज अंत्यसंस्कारजैन यांचे पार्थिव शनिवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत पुन्हा अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.राजेंद्र दर्डा यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वनलोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर-इन-चिफ राजेंद्र दर्डा यांनी भंवरलाल जैन यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करीत अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी अशोक जैन यांच्यासह जैन कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कवी ना. धों. महानोर, डॉ. सुभाष चौधरी यांचीही भेट घेऊन भाऊंबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. भंवरलाल जैन यांनी पर्यावरण रक्षणासाठी जे काम केले ते पाहून समाधान वाटले. जमिनीप्रमाणे त्यांनी टेकड्याही हिरव्यागार केल्या. जैन इरिगेशन व भंवरलाल जैन यांचे काम पाहून शेतकरी, शेतीसाठी सकारात्मक प्रयत्न निश्चितच करता येतील. - मनेका गांधी, केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्रीभंवरलाल जैन यांचे मोठे लोभस दर्शन त्यांचे काम, उपक्रम, योगदान यातून घडते. ते विज्ञानवादी, जिज्ञासू होते, तरी त्यांनी माणसं सांभाळण्याचे काम केले. त्यांच्यातील प्रेमळ माणसाची जाणीव पदोपदी झाली. त्यांचे कार्य नेहमीच स्मरणात राहणारे असेच आहे. - अरुण फिरोदिया, अध्यक्ष,कायनेटीक इंजिनीअरिंग लि., पुणेभंवरलाल जैन हे समर्पित असे व्यक्तिमत्त्व आहे. निसर्गाशी नाते सांगणारे त्यांचे काम आहे. त्यांचे शेती, मातीच्या विषयांचे लेखन, शेतीसाठीचे काम प्रेरणादायी आहे. - डॉ. विकास आमटे, ज्येष्ठ समाजसेवकभंवरलाल जैन यांच्याबाबत जे साहित्य, लेखन आहे ते त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय घडविणारे असेच आहे. त्यांचे शेती, पर्यावरण क्षेत्रातील काम मोठे आहे. त्यांचे बहुआयामी, सद्गुणी चरित्र पुढच्या पिढ्यांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शक राहील. - भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिकभाऊ म्हणजे निर्मळ, निगर्वी, शानदार, शालिन असं व्यक्तिमत्त्व. त्यांचं जीवनच एक पुस्तक आहे, एक ग्रंथ आहे, एक संदेश आहे. - अरुणभाई गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष भंवरलाल भाऊ म्हणजेच मोठे भाऊ यांनी शेती, मातीशी निगडित प्रश्न सोडविण्याचेच काम केले. गरीब शेतकरी, बळवंत शेतकरी याला समृद्ध करण्याचं काम करणारे भाऊ होते. शेतकऱ्यांना परवडेल, असा प्लॅस्टिक पाइप त्यांनी तयार केला. कुणी काही म्हणत असले तरी हरित क्रांती जर झाली असेल तर ती पीव्हीसी पाइपमुळे. - ना. धों. महानोर, प्रख्यात कवीमाणसं जोडणं हा भाऊंचा पैलू होता. कोणत्याही माणसाला अचूक ओळखण्याची त्यांची क्षमता दांडगी होती. एकदा जोडलेली माणसे भाऊ आयुष्यभराकरिता कायमची जपत. - दलूभाऊ जैन, ज्येष्ठ समाजसेवक