ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 12 - सास-याकडे जेवण सुरु असताना त्याच वेळी जावयाच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना रविवारी भर दुपारी दीड वाजता गणेश कॉलनीतील श्रीहरी नगरातील सिध्दीविनायक पार्कमध्ये घडली. अवघ्या तीस मिनिटात चोरट्यांनी हात साफ केला आहे. अलिशान कारमधून चार ते पाच चोरटे आले होते. कुणाकडेपाहुणेआलेअसावेम्हणूनशेजाºयांनीदुर्लक्षकेल्यानेचोरट्यांनीडावसाधला.
नूतन मराठा विद्यालयात शिक्षक असलेले अरुण एस.ठाकरे हे सिध्दीविनायक पार्क या अपार्टमेंटमध्ये दुसºया मजल्यावर पत्नी कविता यांच्यासह वास्तव्याला आहेत. मुलगा प्राज्वल हा पुणे येथे अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाला असल्याने पत्नी कविता या शनिवारी रात्रीच मुलाकडे पुणे येथे गेल्या होत्या, त्यामुळे अरुण ठाकरे हे एकटेच घरी होते.
अर्ध्या तासात चोरट्यांनी साधला डाव-
ठाकरे यांचे सासरे प्रा.बी.जे.जाधव हे समोरच्याच गल्लीत वास्तव्यकरतात. पत्नी घरी नसल्याने ठाकरे हे सासºयांकडे दुपारी १ वाजता जेवायला गेले होते. तेथून दीड वाजता घरी येत असतानाच रस्त्यावरुनच बेडरुमधील कपाटाचा दरवाजा त्यांना उघडा दिसला.वरच्या मजल्यावर गेले असता दरवाजाला फक्त कडी लावलेली होती व कुलूप गायब झालेले होते. दरवाजा उघडल्यावर कुलूप कापल्याचा कच खाली पडलेला होता तर हॉलमध्येच सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. घरात चोरी झाल्याचा संशय आल्याने ठाकरे यांनी शेजारच्या महिलेला बोलावून घेतले. दोन्ही बेडरुमची तपासणी केली तर त्यातील कपाटे उघडे होती व सामानही फेकलेला होता.