सिंचन प्रकल्पाची चौकशी जयंत पाटील यांनी फेटाळली; काँग्रेसने केली होती मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 03:23 AM2020-02-27T03:23:17+5:302020-02-27T07:01:00+5:30
काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसेंनी केली होती मागणी
मुंबई : फडणवीस सरकारच्या काळात व्यय अग्र समिती (ईपीसी) कडून मान्यत न घेताच नियमबाह्य पद्धतीने ६ हजार १४६ कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. या प्रकरणाची चौकशीची काँग्रेस सदस्यांची मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी फेटाळून लावली.
फडणवीस सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पात दिलेल्या मान्यता संशयास्पद आहेत. यात हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचा संशय आहे. या सर्व प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून केली.
या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एसआयटी चौकशीची मागणी फेटाळून लावली. या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता द्यायला गेल्या सरकारने घाई का केली याच्या खोलात जाण्याची आवश्यकता आहे, असेही पाटील म्हणाले.