शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

Jayant Patil vs Amit Shah: जयंत पाटील यांचं 'ओपन चॅलेंज'; म्हणाले- "शाहांना आम्ही हे मराठी राज्य मोडू देणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 1:46 PM

Jayant Patil vs Amit Shah, Maharashtra Politics: "अफगानिस्तानहून कांदा आणून शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा सरकारचा डाव"

Jayant Patil vs Amit Shah: भाजपाची नुकतीच महाराष्ट्रात एक बैठक झाली. त्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. या बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला असल्याचे वृत्त अनेक प्रसारमाध्यमांनी दिले. हे लोक म्हणतात महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखा. निवडणुका जम्मू काश्मीरमध्ये, हरियाणामध्ये लागल्या आहेत आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आढावा घेत आहेत. औरंगजेब २६ वर्षे महाराष्ट्रात राहिला पण मराठी माणसाचे राज्य त्याला मोडता आले नाही. शाहांनाही आम्ही हे मराठी राज्य मोडून देणार नाही, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये पोहोचली आहे. तेथे जाहीर सभेत जयंत पाटलांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. याशिवाय, अफगानिस्तानहून कांदा आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. अशा प्रकारे बाहेरून कांदा मागवून शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव सरकारने आखला आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला.

जयंत पाटील म्हणाले, अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानहून आला आणि पानीपतची लढाई झाली. आता अमित शाह आणि त्यांच्या सरकारने त्याच अफगाणिस्तानतून कांदा आणला आहे. त्यामुळे कांद्याचे दर कोसळत आहे. मराठी सैन्याचे पानीपत झाले तिथून शाह आणि त्यांच्या सरकारने कांदा आणला आणि मराठी शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव आखला आहे असा आरोप करत असतानाच देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळू नये अशी भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी घेतली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNashikनाशिकAmit Shahअमित शाहBJPभाजपाAfghanistanअफगाणिस्तानonionकांदा