शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? जयंत पाटलांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 12:02 PM

"सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे पुण्याची देशभर बदनामी"

Jayant Patil, Pune Vanraj Andekar Murder: पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात गोळीबार आणि हत्येची खळबळजनक घटना घडली. नाना पेठेसारखा गजबजलेल्या भागात रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. राज्यातील प्रमुख शहारापैकी एक असलेल्या पुण्यामध्ये ही खळबळजनक घटना घडली. शहरात भरचौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल जयंत पाटील यांनी केला. तसेच, आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी या घटनेबाबत मत व्यक्त केले.

"पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे देशभर बदनाम होऊ लागले आहे. या घटनांना आणि पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?" अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुण्यात नेमका काय घडला प्रकार?

रविवारी रात्री पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. नाना पेठे या अतिशय गजबजलेल्या ठिकाणी चौकात वनराज आंदेकर हे चुलत भावासोबत थांबले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. आंदेकर बेसावध होते, गप्पा मारत उभे होते. त्यावेळी काही समजण्याच्या आतच सहा दुचाकींनी त्यांना गराडा घातला. या दुचाकीवरून आलेल्या एकूण १३ जणांनी आंदेकर यांना घेरले. सुरुवातीला त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात वनराज आंदेकर यांचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व थरार जवळच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार