" जयंतराव..तुम्ही जर 'ही' गोष्ट मनावर घेतली तर परत पैसे मागण्याची वेळ येणार नाही.."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 02:32 PM2020-09-25T14:32:44+5:302020-09-25T14:54:54+5:30

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील राज्य आढावा बैठकीत अजित पवार आणि जयंत पाटील यांची चांगलीच जुगलबंदी रंगली. 

"Jayantrao..if you take this thing to heart, you won't have to ask for money again": | " जयंतराव..तुम्ही जर 'ही' गोष्ट मनावर घेतली तर परत पैसे मागण्याची वेळ येणार नाही.."

" जयंतराव..तुम्ही जर 'ही' गोष्ट मनावर घेतली तर परत पैसे मागण्याची वेळ येणार नाही.."

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपूर्ण राज्याचा आढावा 

पुणे : " मुख्यमंत्रीसाहेब, एकट्या सांगलीने एक तास घेतला... इतर सर्वांनी थोडे उरकते घ्यावे अशी सूचना राज्य आढावा बैठकीत करत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी याचवेळी माजी अर्थमंत्री व सध्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटलांना एक 'रोखठोक' सल्लाही दिला. ते म्हणाले, आम्ही पुण्यात लोकांना मास्क घालण्याची सवय लागावी म्हणून ५०० रुपये दंड करून आतापर्यंत ७ कोटी ४५ लाख वसूल केले. किती दंड वसूल केला हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पण लोकांना सवय लागते. सांगली जिल्ह्यात तातडीने दंड आकारणी सुरू केली तर ५० लाख, एक कोटी मागण्याची वेळ येणार नाही. यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देखील तितक्याच नम्रपणे अर्थमंत्र्यांच्या 'त्रासा'ची नोंद घेतली असून, त्यांच्या सूचनेची त्वरीत अंमलबजावणी सुरू करू असे सांगताच व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यासह सर्वांनाच हसू फुटले. 

पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याचा कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपूर्ण राज्याचा आढावा सुरू केला. यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांची चांगलीच जुगलबंदी रंगली. 

व्हिडिओ काॅन्फरन्समध्ये सुरूवातच सांगली जिल्ह्यापासून झाली. या बैठकीत पाटील यांनी रुग्णसंख्या आणि मृत्यूदर वाढत आहे. तसेच सांगली जिल्ह्यात मास्क न घालणाऱ्यांना ग्रामीण भागात वेगळा दंड आणि शहरी भागात वेगळा दंड घेतला जातो.हा दंड संपूर्ण राज्यात सारखाच करण्याची मागणी केली. तसेच सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या विविध उपाययोजनासाठी निधीची गरज असून,  त्वरीत उपलब्ध करून द्यावी अशी देखील मागणी केली. यावर पवार यांनी पुणे जिल्ह्यात सरसकट मास्क न घालणा-यांना 500 रुपये आणि रस्ता , सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-याला 1000 रुपये दंड घेतला जातो. गेल्या काही दिवसांत तब्बल 7 कोटी 75 लाखांचा दंड वसूल झाल्याचे सांगत... जयंतराव तुमच्याकडे देखील त्वरीत अंमलबजावणी सुरू करा म्हणजे दंड मागण्याची वेळ येणार नाही असे सांगितले.

Web Title: "Jayantrao..if you take this thing to heart, you won't have to ask for money again":

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.