मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे यांनी त्यांच्या इच्छापत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या दाव्यावरील सुनावणी सुरू असतानाच जयदेव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणखी अडचण निर्माण केली आहे. जयदेव यांनी उद्धव व बिंदुमाधव यांच्या कुटुंबियांविरुद्ध आणखी दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे. या दाव्यावरील सुनावणी पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या नाताळ सुटीमध्ये म्हणजेच ३१ डिसेंबर २०१५ रोजी उद्धव आणि बाळासाहेबांचे दिवंगत ज्येष्ठ पुत्र बिंदूमाधव ठाकरे यांच्या पत्नी माधवी, मुलगी नेहा आणि मुलगा निहार यांच्याविरुद्ध दावा दाखल केला. बाळासाहेबांच्या इच्छापत्रात जयदेव यांच्या नावावर काहीच ठेवण्यात आले नाही. तरी कायदेशीर वारस या नात्याने त्यांच्या संपत्तीतील वाटा मिळवण्यासाठी जयदेव यांनी हा दावा दाखल केला आहे.मर्जीनुसार इच्छापत्र केल्याचा आरोपबाळासाहेबांनी १३ डिसेंबर २०११ रोजी तयार केलेल्या इच्छापत्रावरुन जयदेव आणि उद्धव यांच्यामध्ये वाद निर्माण झाले आहेत. उद्धव यांनी बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा घेऊन त्यांच्या मर्जीनुसार इच्छापत्र तयार करून घेतल्याचा आरोप जयदेव यांनी केला आहे. बाळासाहेबांनी त्यांच्या संपत्तीतील बहुतांशी वाटा उद्धव ठाकरे यांच्या नावावर केला आहे. वांद्रे येथील ‘मातोश्री’ बंगल्याचा तिसरा मजला उद्धव व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर केला आहे. तर दुसरा मजला माधवी व त्यांच्या मुलांच्या नावावर केला आहे. आधी दाखल केलेला टेस्टमेंटरी दावा निकाली लागेपर्यंत बाळासाहेबांची संपत्ती विकण्यात येऊ नये किंवा तिसऱ्या पक्षाचे अधिकार निर्माण करू नये, यासाठी जयदेव यांनी केलेला अर्ज २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने फेटाळला होता.
उद्धव ठाकरेंविरुद्ध जयदेव यांचा नवा दावा
By admin | Published: January 30, 2016 4:14 AM