ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 11 - संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) अॅडव्हान्स 2017 च्या परीक्षेत पुण्याचा अक्षत चुग हा देशात दुसरा आला आहे. चंदीगडचा सर्वेश मेहतानी याने या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला. दिल्लीच्या अनन्य अग्रवालने तिसरा क्रमांक मिळवला आहे.
या परिक्षेत 366 पैकी 335 गुण मिळवून अक्षत देशात दुसरा व महाराष्ट्रात पहिला आला आहे. 21 मे 2017 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. अक्षत हा दिल्ली पब्लिक स्कुलमधून बारावी उत्तीर्ण झाला. वेळेचे व्यवस्थापन योग्य रीतीने करून जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यावर भर दिल्याचे अक्षतने सांगितले. बॉम्बे आयायटीमधून कम्प्युटर सायन्समध्ये पदवीचे शिक्षण घेणार असल्याचेही त्याने सांगितले. अक्षतचे वडील टाटा कंपनी मध्ये अधिकारी आहेत तर आई गृहिणी आहे.
आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देणारी कठीण परीक्षा समजली जाणा-या जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी स्वतःचा निकाल जेईई अॅडव्हान्सच्या अधिकृत वेबसाइट(Jeeadv.ac.in) वर पाहू शकतात. याशिवाय विद्यार्थ्यांना नोंदणीकृत मोबाईल नंबरवर निकालाचे मॅसेजही पाठवण्यात येणार आहेत. जेईई अॅडव्हान्सच्या परीक्षेत हरियाणातील पंचकुलचा सर्वेश मेहतानी हा देशात पहिला आला आहे.
या परिक्षेत औरंगाबादच्या ओंकार देशपांडे याने देशात आठवा क्रमांक मिळवला. यावेळी लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी ओंकारचा सत्कार केला. औरंगाबादमध्येच अभ्यास करून देशात आठवा क्रमांक पटकावणं भूषणावह आहे, अशा गुणी विद्यार्थ्याचं कौतुक करताना मला आनंद झाल्याचं ते म्हणाले.
आयआयटीमधल्या विविध पदवीधर कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई अॅडवान्सचं आयोजन केलं जातं. जेईई अॅडव्हान्सचे पेपर 1 आणि पेपर 2ची परीक्षा 21मे रोजी झाली होती. 1 लाख 7 हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी बसले होते. त्यात खुल्या वर्गातील आणि इतर मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास समान आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचे खुल्या वर्गातील 4 हजार 394 विद्यार्थी, तर इतर मागासवर्गीय वर्गातील 7 हजार 460 विद्यार्थी आणि अनुसूचित जातीचे 4 हजार 619 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
राजस्थानचा सूरज देशात पाचवा आला आहे. सूरजला 366 पैकी 330 गुण मिळाले आहेत. सूरजचे वडील कंत्राटी शिक्षक असून, आई गृहिणी आहे. सूरज हा राजस्थानच्या कोटामधील व्हायब्रंट अकॅडमीचा विद्यार्थी आहे. पुण्यातील अक्षत चुघ हा देशात दुसरा आला आहे. देशात पहिल्या आलेल्या सर्वेशला 366 पैकी 339 गुण मिळाले आहेत. जेईई मेन्समध्ये तो 55वा होता. सर्वेश हा चंदीगडचा विद्यार्थी आहे.
असा पाहा निकाल-
जेईई अॅडव्हान्सच्या अधिकृत वेबसाइट(Jeeadv.ac.in) जा
वेबसाइटवर रिझल्ट पेजवर क्लिक करा
JEE Advanced (2017) क्लिक करा
त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून रिझल्ट पाहा
विद्यार्थी results.nic.in या results.gov.in इथेही निकाल पाहू शकतात