नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएचा जेईई मेन्स सेशन-२ चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत देशभरातून एकूण २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत, ज्यात महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थ्यी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात.
ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिलमध्ये दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती. यावर्षी एकूण १५ लाख ३९ हजार ८४८ उमेदवारांनी अर्जक केला होता. त्यापैकी १४ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थी परीक्षेला बसले. यातील २ लाख ५० हजार २३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं एप्रिल सत्राची अंतिम उत्तरपत्रिका अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली आहे.
या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्यांमध्ये सर्वाधिक ७ विद्यार्थी राजस्थानचे आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रेदश येथील प्रत्येकी तीन विद्यार्थी या यादीत आहेत. तर, पश्चिम बंगाल, दिल्ली गुजरात येथील प्रत्येकी दोन आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील दोन विद्यार्थ्यांचाही या यादीत समावेश आहे.
परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी१) मोहम्मद अनस - राजस्थान२) आयुष सिंघल - राजस्थान३) आर्किसमन नंदी - पश्चिम बंगाल४) देवदत्त माझी - पश्चिम बंगाल५) आयुष रवी चौधरी– महाराष्ट्र६) लक्ष्य शर्मा - राजस्थान७) कुशाग्र गुप्ता - कर्नाटक८) हर्ष गुप्ता - तेलंगणा९) आदित प्रकाश भेगडे – गुजरात१०) दक्ष - दिल्ली११) हर्ष झा - दिल्ली१२) रजित गुप्ता - राजस्थान१३) श्रेयस लोहिया - उत्तर प्रदेश१४) सक्षम जिंदाल - राजस्थान१५) सौरव - उत्तर प्रदेश१६) वनगाला अजय रेड्डी - तेलंगणा१७) सानिध्या सराफ– महाराष्ट्र१८) विशाद जैन - महाराष्ट्र१९) अर्णव सिंग - राजस्थान२०) शिवेन विकास तोष्णीवाल – गुजरात२१) कुशाग्र बांघा – उत्तर प्रदेश२२) साई मनोगना गुठीकोंडा – आंध्र प्रदेश२३) ओम प्रकाश बेहरा – राजस्थान२४) बानी ब्रता माझी - तेलंगणा