मुंबई : देशातील आणि राज्यातील अभियांत्रिकी आणि आयआयटीच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या जेईई मेनची पेन अॅण्ड पेपर बेस (आॅफलाइन) परीक्षा शनिवार, ४ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. तर आॅनलाइन परीक्षा १0 आणि ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. बारावी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका किंवा बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीटची प्रत परीक्षा केंद्रावर देणे बंधनकारक करण्यात आले आहे.शैक्षणिक वर्ष २0१५-१६ करिता राज्यातील चार वर्षे कालावधीच्या अभियांत्रिकी/ तंत्रशास्त्र पदवी अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश जेईई मेन परीक्षेच्या आधारे करण्यात येणार आहेत. राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षा देणे बंधनकारक आहे. पेन पद्धतीने होणारी परीक्षा शनिवार, ४ एप्रिल रोजी आणि संगणकीय पद्धतीने होणारी परीक्षा शुक्रवार १0 आणि ११ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
जेईई मेनची आॅफलाइन परीक्षा शनिवारी
By admin | Published: April 03, 2015 2:25 AM