शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

तब्बल 15 तास रंगला जेजुरीचा “मर्दानी दसरा”, 42 किलोच्या खंडा तलवारीचे “मर्दानी खेळ”; खंडेरायाच्या “मर्दानी दसरा” सोहळ्याची सांगता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 5:11 PM

महाराष्ट्राचे लोकदैवत असण-या खंडेरायाच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपारीक पद्धतीने “मर्दानी दसर्याचे” आयोजन करण्यात येते, तब्बल 15  तासापेक्षाही जास्त काळ हा सोहळा खंडेरायाच्या  गडावर संपन्न होत असतो.

पंढरपूर - महाराष्ट्राचे लोकदैवत असण-या खंडेरायाच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपारीक पद्धतीने “मर्दानी दसर्याचे” आयोजन करण्यात येते, तब्बल 15  तासापेक्षाही जास्त काळ हा सोहळा खंडेरायाच्या  गडावर संपन्न होत असतो. दस-याच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता खंडेरायाची पालखी सीमोल्लघनाला गेल्यानंतर सुरु झालेला मर्दानी दसर्याची आज खंडा तलवारीचे मर्दानी खेळ संपन्न झाल्यानंतर समारोप झाला..राज्यातील लाखो भाविक मर्दानी दसर्यासाठी खंडेरायाच्या गडावर दाखल झाले होते ,  अनेक वर्षापासून  चालू असलेल्या ४२ किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून सारेच थक्क झाले. येळकोट येळकोट ! जय मल्हार ! जल्लोष आणि भंडार्‍याच्या मुक्त उधळणीत उत्साह, आनंद आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणार्‍या खंडेरायाच्या जेजुरीचे, उभ्या महाराष्ट्रत जेजुरीच्या खंडेरायाच्या दसरा सोहळ्याला “मर्दानी दसरा” म्हणून ओंळखले जाते ,खंडेरायाचा दसरा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत आधीच दाखल होतात... , जेजुरीकर सुद्धा वर्षभर कुठेही असले तरी “दसर्या निमित्त” गडावर येऊन सोहळ्यात सहभागी होतच असतात मल्हारी मार्तंडाच्या वर्षभरात 12 मोठ्या यात्रा जरी भरत असल्या तरी या “दस-या ” च्या यात्रेला विशेष महत्व आहे...- काल दसर्याच्या दिवशी सायंकाळी 6च्या सुमारास हजारो भाविक आणि जेजुरीकरांच्या उपस्थितीत भंडार खोबर उधळीत मल्हारीमार्तंडाच्या जयघोषात पालखी सोहळा रमण्यात सिमोल्लान्घानासाठी निघाला रमण्यात  श्री. मार्तंड भैरवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उस्तव मूर्तींना आनून ,त्या ठिकाणी देवभेटीचा विलोभनीय सोहळा रात्री २च्या सुमारास पार पडला ,पालखी सोहळा रमण्यात जाण्याअगोदर दुपारपासूनच खांदेकरी,मानकरी आणि तसेच भाविकांनी मोठ्या प्रमाणवर गर्दी केली होती, पालखी सोहळ्याला सुरवात करण्याचा इशारा मिळाल्यानंतर भंडार्याची उधळण करत , येलकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात पालखी खान्देकार्यानी खांद्यावर घेतली , नन्तर गडावर प्रदक्षिणा घालून हा पालखी सोहळा रमण्यात निघाला , रात्री २ च्या सुमारास “देवभेटीचा” नयनरम्य सोहळा पार पडलापालखी सोहळा जेजुरी गडावर आल्यावर रंगतात ते म्हणजे मर्दानी खेळांची स्पर्धा , 12 वर्षपासून ते  60 वर्षापार्य्नात भक्त या स्पर्धेत उस्ताहाणे सहभागी होतात ,तब्बल ४२ किलोंची असणारी एका हातात जास्तीत जास्त वेळ पेलून धरण्याची ,आणि दातान उचलून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धाच या ठिकाणी रंगते, ४२ किलो वजन असनारी हि खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी अडीचशे वर्षपूर्वी अर्पण केली ,तेव्हापासून दसर्याच्या दुसर्या दिवशी पालखी सोहळा गडावर आला कि ती उचलली जाते , अशाप्रकारे मर्दानी खेळातून खंडोबाचे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करत असतात – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असेल्याने लाखो भाविक जेजुरी गडावर नेहमीच येत असतात, शेकडो वर्षांची असेलली परपरा जोपासत भक्तीमय वातावरणात , पिवळ सोन अर्थात भंडारा उधळून , फटाक्यांच्या अताशबाजीत सलग १५ तास हा मर्दानी दसरा संपन्न झाला.. जेजुरी नगरीला सुवर्णनागीरचे स्वरूप प्राप्त झाले होते , या मर्दानी दसर्यानिमित्त “देवा तुजी सोन्याची जेजुरी”असाच प्रत्यय भाविकांना येतो.....येळकोट येळकोट जय मल्हार.....