मुंबई : धनगर आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेत, धनगर आरक्षण संघर्ष समिती आणि भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेने जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर १९ फेब्रुवारीला धनगर समाजाचे कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी जातील, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले की, ‘धनगर समाजाला पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांपूर्वी विरोधी बाकावर असताना दिले होते. त्यानंतर, आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रावर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे धनगर आरक्षण नेमके कधी देणार? याचा जाब विचारण्यासाठी हजारो कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर धडकणार आहेत. शिवाय प्रतिज्ञापत्रावर मुख्यमंत्री आरक्षणाची हमी देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार,’ असा इशाराही पाटील यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
धनगर आरक्षणासाठी जेलभरो आंदोलन
By admin | Published: February 09, 2017 2:41 AM