ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 24 - आशिया, युरोप खंड आणि आॅस्ट्रेलियातील अत्युच्च उंचीवर शिखरे सर करून जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मराठवाड्याची जिगरबाज महिला गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिने तब्बल दोन रात्री डेथ झोन म्हणून ओळखल्या जाणा-या कॅम्प ४ वर काढल्या; परंतु १00 कि. मी. प्रति वेगाने वाहणारे जोरदार वादळ आणि खराब हवामानामुळे तिला मंगळवारी कॅम्प २ वर परतावे लागले. बुधवारी ती बेस कॅम्पवर सुखरूप पोहोचली.
कॅम्प ४ हे २६ हजार ८५ फूट उंचीवर आहे आणि एव्हरेस्ट शिखराची उंची २९ हजार ३५ फूट आहे. जवळपास दीड महिन्यापासून इंडियन कॅडेट फोर्सची कॅडेट मनीषा वाघमारे ही एव्हरेस्ट मोहिमेवर आहे. गुरुवारी तिने बेसकॅम्पवरून पहाटे २ वाजता प्रत्यक्ष माऊंट एव्हरेस्ट चढण्यास सुरुवात केली होोती आणि त्यानंतर तिने थेट कॅम्प २ गाठले होते. त्यानंतर तिने यशस्वीपणे कॅम्प ४ यशस्वीपणे गाठले होते. त्याच दिवशी रात्री माऊंट एव्हरेस्टच्या सागर माथ्यावर मार्गक्रमण करण्याच्या तयारीत ती होती; परंतु १00 कि.मी. प्रति वेगवाने वाहणाºया जोरदार वादळामुळे या अडथळ्यामुळे ती एव्हरेस्टकडे कूच करू शकली नाही. तिने साऊथकोलकडून मार्गक्रमण करीत एव्हरेस्ट शिखर अवघ्या २00 मीटर अंतरावर असताना तेथपर्यंत मजल मारली; परंतु अचानक हवामान खराब झाल्यामुळे तिला माघार घ्यावी लागली. मंगळवारीही सकाळपासूनच खराब हवामान होते. त्यामुळे अखेर महिला महाविद्यालयात क्रीडा संचालिका असणाºया मनीषा वाघमारे हिला कॅम्प ४ वरून परतावे लागले आहे. बुधवारी मनीषाला बेस कॅम्पवर पोहोचावे लागले. त्यामुळे मनीषा जगातील सर्वांत जास्त उंचीवर असणारे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून तिचे स्वप्न साकार करण्याच्या उंबरठ्यावर होती; परंतु सलग तासन्तास चढाई केल्यामुळे आलेला प्रचंड थकवा पाहून मनीषाचा फिटनेस पाहूनच एव्हरेस्ट चढाईचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिची अचिव्हमेंट खूप मोठी -
जबरदस्त फिटनेस आणि जिद्द दाखवूनही फक्त हवामानाच्या अडथळ्यांमुळे मंगळवारी मनीषा वाघमारे हिला जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करता आले नाही; परंतु तिचे अचिव्हमेंट खूप मोठे असल्याचे मत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे आणि इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एव्हरेस्टवरील कॅम्प ४ याची ओळख ‘डेथ झोन’ अशी आहे. तब्बल ८ हजार मीटर उंचीवर कॅम्प ४ आहे आणि तेथे मायनस ५0 व मायनस ६0 टेम्परेचर असते, तसेच ताशी १00 कि. मी. प्रति वेगाने वादळ वाहत असते. त्यामुळे येथे मानवी शरीर जास्त काळ येथे राहू शकत नाही, असे आनंद बनसोडे म्हणाले.
अशा प्रतिकूल परिस्थितीतही मनीषा वाघमारे हिने ‘माऊंट एव्हरेस्ट शिखर’ करण्यासाठी डेथ झोन समजल्या जाणाºया कॅम्प ४ वर दोन रात्री काढल्या. अशा परिस्थितीत कितीही फिटनेस चांगला असला तरी शरीर तुम्हाला साथ देत नाही. शरीर कमकुवत बनत जाते. त्यामुळे मनीषाची अचिव्हमेंट ही खरोखरीच खूप मोठी आहे, असेही आनंद बनसोडे आणि विनोद नरवडे यांनी सांगितले.
१0 वर्षांत प्रथमच खराब हवामान-
एव्हरेस्ट शिखरावर एवढे प्रचंड खराब हवामान याआधी कधीही नव्हते. या वेळेस हवामानाचा अंदाज कोणालाच बांधता आला नाही. सर्व हवामानाचे अंदाज या वेळेस चुकले. अशा परिस्थितीत मनीषा वाघमारेने कॅम्प ४ वर दोन रात्र राहून दाखवलेली जिगर ही प्रशंसनीय बाब आहे, असे सुरेंद्र शेळके यांनी सांगितले. सुरेंद्र शेळके हे २0१२ पासून माऊंट एव्हरेस्ट मोहीम करणाºया गिर्यारोहकांना मार्गदर्शन करतात.
अवघे २00 मीटर उरले होते-
मनीषा वाघमारे ही जवळपास जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे माऊंट एव्हरेस्ट गाठले होते; परंतु अवघे २00 मीटर बाकी असताना हिमसख्खलन व वादळी वाºयामुळे सोबत असणाºया शेरपाने माघारी परतण्याचा निर्णय घेतला, असे इंडियन इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांनी सांगितले.
माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची अजूनही जिद्द-
खराब हवामानामुळे मंगळवारी एव्हरेस्ट सर करता आले नसले तरी २६ व २७ मे रोजी ओपन विन्डो असल्यामुळे मनीषा वाघमारे हिने अपाण माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द दाखवली आहे. त्याचप्रमाणे तिने बेसकॅम्प ते लुकला यादरम्यान मॅरेथॉनमध्ये धावणार असल्याचे आपल्याला बुधवारी सांगिितले असल्याची माहिती कमांडर विनोद नरवडे यांनी दिली.