- अनिल गवई /मुकुंद पाठकलोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा जि.(बुलडाणा): राजमाता जिजाऊ यांचा ४२३ वा जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील जिजाऊ राजवाड्यात अतिशय साध्यापध्दतीने साजरा करण्यात आला. कोरोना आपत्तीचे सावट या सोहळ्यावर स्पष्टपणे जाणवल्याचे दिसून आले. कोरोना विषाणू संसर्गामुळे सिंदखेड राजा येथील सर्व सोहळ्यांना शासनाने परवानगी नाकारल्यानंतर लक्षावधी जिजाऊ भक्तांचा हिरमोड झाला.
जिजाऊ राजवाड्यात सकाळी ६ वाजता पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, माजी आमदार डॉ. शशीकांत खेडेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी सपत्नीक राजमाता जिजाऊचे पूजन केले. मराठा सेवासंघाच्यावतीने सेवासंघाचे पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांचे पूजन केले. यात जयश्रीताई कामाजी पवार, प्रितीताई सौरभ खेडेकर, वंदनाताई मनोज आखरे, अर्चनाताई सुभाष कोल्हे, वनिताताई मोहन अरबट, किरणताई राजेंद्र ठोसरे, ज्योतीताई शिवाजी जाधव, अरूणाताई योगेश पाटील, शीतलताई शिवाजी तनपुरे, मोहिनीताई रविंद्र चेके यांचा समावेश होते.
त्यानंतर नगर पालिकेच्यावतीने नगराध्यक्ष सतीष तायडे, मुख्याधिकारी प्रशांत भटकर, उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनिल सावंत, पोलिस निरिक्षक जयवंत सातव, जिल्ह्यातून आलेले पोलीस अधिकारी यांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन केले. दरम्यान, जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार जिजाऊ राजवाडा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजेसाठी उघडण्यात आला. सिंदखेडराजा शहरात १४४ कलम लागू असल्याने शहराकडे येणारे सर्व मुख्यमार्ग पोलीसांनी बंद केले. कोरोना विषाणू संकटामुळे यंदा जिजाऊ सृष्टीवर सर्वच कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली. पोलीस प्रशासनाच्यावतीने सिंदखेड राजा शहराकडे येणाºया मार्गावर सोमवारी सायंकाळपासूनच नाकाबंदी करण्यात आली. परिणामी, दरवर्षी जिजाऊ सृष्टीवर लोटणाºया जनसागराला पायबंद बसला.
जिजाऊ सृष्टीवर शिवध्वजारोहणसिंदखेड राजा येथील जालना रोडवरील जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाच्या पदाधिकाºयांकडून सकाळी ९:३० वाजता शिवध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अर्जूनराव तनपुरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिजाऊ बिग्रेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरीताई भदाणे, जिजाऊ सृष्टीचे संचालक अॅड. राजेंद्र ठोसरे, अॅड. अतुल हाडे यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती होती. त्यानंतर शाहीर दिलीप पिंपळे आणि संच यांनी शाहीरी पोवाडे सादर केले.
जिजाऊ भक्तांना खिचडीचे वितरणसिंदखेड राजा येथील उत्कर्ष फाऊडेशनच्यावतीने जिजाऊ राजवाडा परिसरात येणाºया जिजाऊ भक्तांना खिचडीचे वितरण करण्यात आले. फाऊडेशनच्यावतीने दरवर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. उत्कर्ष फांऊडेशनचे संस्थापक उच्च शिक्षण उपसचिव सिद्धार्थ खरात, प्राचार्य सुनिल सुरले, संचालक प्रविण खरात, संजय मेहेत्रे यांच्या हस्ते खिचडीचे वितरण झाले
आकर्षक रांगोळ्यांनी वेधले लक्षराजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त राजवाडा परिसर आणि जिजाऊ सृष्टीवर आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या. राजवाडा परिसरातील रांगोळी राजीव गांधी विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी रेखाटल्या तर जिजाऊ सृष्टीवरील रांगोळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकाºयांनी रेखाटल्या होत्या.
कडेकोट पोलीस बंदोबस्तसिंदखेड राजा शहरात जिजाऊ जयंती निमित्त कडेकोड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. जयंतीच्या पूर्वसंध्येला सोमवारी बुलडाणा येथील पोलीस निरिक्षक शेगोकार यांच्या नेतृत्वात बॉम्ब शोधक पथकाने शेरा श्वानाच्या मदतीने जिजाऊ राजवाडा व जिजाऊ सृष्टी परिसराची तपासणी केली. शहरात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसह २०० पोलीस कर्मचाºयांनी बंदोबस्त सांभाळला. अतिरिक्त पोलीस अधिक्षक, दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, तीन पोलीस निरिक्षक, १३ सहा. पोलीस निरिक्षक, प्रत्येकी ३० जणांचे दोन आरसीपी पथक बंदोबस्तासाठी तैनात होते.