शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जेझिंदरचे प्राध्यापक तरुणीशी आर्थिक हितसंबंध, घरात सापडली चिठ्ठी, ड्रग्सप्रकरणी घरावर छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 5:47 AM

आंबोलीत गळफास घेऊन आत्महत्या केलेला युवक जेझिंदर बलदेवसिंग विर्क याने अपहरण केलेली प्राध्यापिका दिलप्रीत कौर ही पंजाबमधील व्यास येथे कारमध्ये बसलेली शेवटची दिसली आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

सावंतवाडी, दि. 23 - आंबोलीत गळफास घेऊन आत्महत्या केलेला युवक जेझिंदर बलदेवसिंग विर्क याने अपहरण केलेली प्राध्यापिका दिलप्रीत कौर ही पंजाबमधील व्यास येथे कारमध्ये बसलेली शेवटची दिसली आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यानंतर आंबोलीपर्यंत ती दिसलीच नाही, असे पंजाब पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जेझिंदर याचे दिलप्रीत हिच्याशी काही आर्थिक व्यवहार होते. तशी चिठ्ठीही तिने आपल्या घरात लिहून ठेवल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे या तपासामागचा गुंता वाढत चालला आहे. तसेच जेझिंदर हा ड्रग्स तस्करीत असल्याचेही पोलिसांनी मान्य केले आहे. त्याच्यावर पंजाबमध्ये गुन्हाही दाखल आहे. त्यामुळेच पंजाब पोलिसांनी जेझिंदर याच्या घरावर छापेमारी केली आहे.आंबोली येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या जेझिंदर विर्क याच्याबाबत आता नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. पंजाब पोलिसांचे पथक नातेवाईकांसह पुन्हा एकदा सावंतवाडीत दाखल झाले असून, त्यांनी या घटनेची विस्तृत माहिती घेतली. तसेच पोलिसांचे जाबजबाब व पंजाबहून आलेल्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहेत. जेझिंदर याची गेल्या वर्षभरातील माहिती पोलिसांनी गोळा केली आहे. यात जेझिंदर याचे प्राध्यापिका दिलप्रीत हिच्याशी संभाषण आढळून येत आहे.मात्र ११ सप्टेंबरला प्राध्यापिका दिलप्रीत ही जेझिंदर याच्याबरोबर घरातून निघून जाण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ती पोलिसांनी जप्त केली. त्यात मी जेझिंदर याच्यासोबत जात आहे. आमचे दोघांचे आर्थिक व्यवहार आहेत. मात्र, माझ्या जिवाला काही बरे वाईट झाल्यास जेझिंदर यालाच जबाबदार धरावे, असे तिने चिठ्ठीत म्हटले आहे. तर १४ सप्टेंबरला पंजाब पोलिसांत सुरजित सिंग ब्रा नावाच्या व्यक्तीने एक तक्रार दिली. त्यात दिलप्रीत हिचे जेझिंदर विर्क याने तीन लाखांसाठी अपहरण केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पंजाब पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यात जेझिंदर हा जी कार घेऊन निघाला तिची सर्व माहिती गोळा केली. त्यात पंजाबपासून व्यासपर्यंत दिलप्रीत ही जेझिंदरबरोबर होती. तेथून पुढच्या प्रवासाला निघताना दिलप्रीत नसल्याने गूढ वाढले आहे. दिलप्रीत ही जेझिंदरच्या कारमध्ये बसलेली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्यास शहरातील एटीएमच्या बाहेरून मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.पंजाब पोलीस आपल्या मागावर आहेत, याची माहिती जेझिंदर याला मिळाल्याने तो घाबरला होता. त्यातच तो ज्या मार्गाने चालला होता त्याची सर्व माहिती पंजाब पोलिसांकडे होती. त्यामुळे पंजाब पोलिसांनी घटनेच्या आदल्या दिवशी आंबोली येथे त्याची गाडी थांबवून ठेवावी, असे सांगितले होते. पण तत्पूर्वीच त्याने आत्महत्या केली. पंजाब पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार दिलप्रीत हिचे तीन लाखांसाठी अपहरण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, व्यासनंतर दिलप्रीत कुठे दिसलीच नाही. मग जेझिंदरने दिलप्रीतचे काय केले, याचे गूढ वाढले आहे.जेझिंदर हा ड्रग्स तस्कर होता. त्याच्यावर पंजाबमध्ये गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या वर्षभरात गोव्यात आला नाही. मात्र तत्पूर्वी तो आला का, याची माहिती पंजाब पोलिसांकडे नाही. तसेच पंजाब पोलिसांनी जेझिंदर याच्या घरावरही छापे टाकले. मात्र त्यातही आक्षेपार्ह असे काही आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कारमध्ये सापडलेली नशेची इंजेक्शन तसेच अन्य साहित्य हे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे, असे पोलिसांनी जाहीर केले आहे.दरम्यान, जेझिंदर याचे वडील पंजाबच्या राज्यपालांच्या गाडीवर चालक होते. ते आता निवृत्त झाले आहेत. तर एक भाऊ आॅस्ट्रेलियाला असतो, असे सांगण्यात येत आहे. जेझिंदरचे मित्र तसेच शेजारी गुरूवारी रात्री उशिरा सावंतवाडीत दाखल झाले. तर शुक्रवारी पंजाब पोलीस आले. त्यांनी नातेवाईकांकडून जेझिंदरबाबत माहिती घेतली आहे. मात्र नातेवाईकांकडून विस्तृत अशी माहिती देण्यात आली नाही.प्राध्यपिकेबाबत अद्याप माहिती मिळाली नाही : पंजाब पोलीसजेझिंदर याच्यासोबत आलेली प्राध्यापिका दिलप्रीत कौरबाबत अद्यापपर्यंत आम्हाला माहिती मिळाली नाही. पंजाबमधील व्यास येथे ती शेवटची दिसली. तेथून ती दिसली नाही. आम्ही तपास करीत आहोत. जेझिंदर ज्या मार्गाने आला, त्या मार्गावरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील, असे यावेळी पंजाबचे पोलीस अधिकारी प्रवेश चोपडा यांनी सांगितले. तसेच हा युवक ड्रग्स तस्कर होता. त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.