- रुचिरा दर्डा, संस्थापक संचालिका, लोकमत महामॅरेथॉनलोकमत महामॅरेथॉन संकल्पनेचे ध्येय शहरातील रस्त्यावरून धावण्याचा अभूतपूर्व अनुभव प्रदान करणे हा आहे. या शहरांनीच महाराष्ट्राला महान केले आहे. आम्ही अशी पाच शहरे निवडली आहेत, जी आधुनिकता आणि संस्कृती याबरोबर वारसा, इतिहास, कृषी क्षेत्रातील बलस्थान आणि विकास वृद्धी दर्शवितात. महामॅरेथॉन सर्किटच्या अनुभवाद्वारे तुम्ही या अतुल्य तसेच अभूतपूर्व बाबींचे साक्षीदार ठराल यात शंकाच नाही. आता वळूया एका मोठ्या प्रश्नाकडे. यंदाच्या हंगामात ही सर्किट कशी जिंकता येईल?३ महिन्यांत ५ मॅरेथॉन्स३ महिन्यांतील ५ मॅरेथॉन्समध्ये यशस्वी होण्यासाठी हे सर्किट बनवले असून, कोणीही यात तेवढ्याच सहजतेने सहभागी होऊ शकतो. आमच्या तज्ज्ञांनुसार तुम्ही पाचही शहरांत १० कि. मी. लीलया धावू शकता आणि हे सहज शक्य आहे. प्रत्येक मॅरेथॉन ही १५ दिवसांच्या अंतराने होणार आहे. महत्त्वाकांक्षेची ज्योत तुमच्यात पेटलेली आहे आणि तुमची जर २१ कि. मी. धावण्याची तीव्र इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला खालील सल्ला देऊ इच्छितो.तुम्ही नाशिक येथील मॅरेथॉनमध्ये २१ कि. मी. अंतरापासून सुरुवात केल्यास यासाठीचा मार्ग हा अतिशय सहायक आणि सुलभ आहे. स्पर्धेत हा खूप चांगला मार्ग आहे. कमी वेळेत तुम्ही धावू शकता आणि त्यासाठी अतिशय सर्वोत्तम सुविधा उपलब्ध आहेत.औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर येथे मॅरेथॉनमध्ये तुम्ही १० कि. मी. अंतरापर्यंत धावू शकता. कोल्हापूरमधील २१ कि. मी. अर्धमॅरेथॉनचे अंतर हे आमच्या आवडीचे आहे. यासाठी आपल्याला आपले शरीर आणखी २१ कि. मी. धावण्यासाठी सज्ज करण्याची गरज आहे.अनेकदा धावपटू हा तर केवळ एक प्रयत्न आहे या संभ्रमात अजून एका २१ कि. मी. शर्यतीत स्वत:ला ढकलतात; परंतु असे काही नसते. प्रदीर्घ अंतरात धावताना आपण आपल्या शरीरातील पेशी आणि द्रव पदार्थ गमावतो. नियमितपणे तुम्ही पूर्ण मॅरेथॉनसाठी सराव करीत नसाल तर २१ कि. मी. परत धावण्यासाठी दोन स्पर्धांत मोठे अंतर असणे आवश्यक आहे. पुण्यातील २१ कि. मी. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन आपण याचा अनुभव घ्यावा, असे आम्हाला वाटते. कारण पुण्यासारखा दुसरा कोणताही अनुभव तुम्हाला मिळणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.२१ कि. मी. आणि १० कि. मी. अंतराच्या धावण्याच्या संयोगामुळे तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा प्राप्त होईल आणि तणावापासून तुम्ही मुक्त व्हाल. दोन शर्यतींच्या मध्ये तुम्ही ३ ते ५ कि. मी. ची शर्यत तंदुरुस्तीसाठी धावली पाहिजे. एका आठवड्याचे नियोजन करून त्यात तुम्ही शक्ती, लवचिकता प्रशिक्षण आणि एक दिवसाचे मालिश याचा समावेश करा.स्नायू खूपच मजबूत करण्याकडे फारच लक्ष देऊ नका आणि हे सर्व तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सल्ल्यानुसार करणे आवश्यक आहे. योग्य आहाराच्या नियोजनाशिवाय यात यशस्वी होता येत नाही. सर्वसाधारणपणे ४०% कार्बोहायड्रेट आणि ३०% प्रोटिन्स आणि ३०% फायबर आहार तुमच्या महत्त्वाकांक्षेला पूरक असतो. धावपटंूच्या आहारात पाणी हा आवश्यक घटक आहे. सर्वाेत्तम हायड्रेशनचे नियोजन करा.महामॅरेथान सर्किटसाठीची नोंदणी बंद होण्याआधी सर्वप्रथम तुम्ही नोंदणी करणे आवश्यक आहे. धावण्यासाठी स्वत:ला सज्ज ठेवा आणि योग्यरीत्या सुरुवात करा. एखाद्या कामाला सुरुवात केल्यानंतर आपण केवळ महत्त्वाकांक्षेच्या जोरावर ती सहज प्राप्त करू शकतो तर मग आता दिरंगाई कसली?
जिंका महामॅरेथॉन सर्किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 1:58 AM