शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

JIO ची नव्या रुपात पुन्हा जुनीच ऑफर

By admin | Published: April 11, 2017 8:01 PM

ट्रायने रिलायन्सने जिओला प्राइमसोबत दिलेली तीन महिन्यांची कॉम्पलिमेंटरी सेवा बंद करा असा आदेश दिल्यानंतर रिलायन्सने नव्या रुपात पुन्हा जुनीच ऑफर दिली आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 - ट्रायने रिलायन्सने जिओला प्राइमसोबत दिलेली तीन महिन्यांची कॉम्पलिमेंटरी सेवा बंद करा असा आदेश दिल्यानंतर रिलायन्सने नव्या रुपात पुन्हा जुनीच ऑफर दिली आहे. या नव्या ऑफरचे नवा जिओ धन धना धन असे असून जिओ समर सरप्राइज ऑफरप्रमाणेच सर्व सुविधा याद्वारे मिळणार आहेत. दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओला 15 दिवसांची वाढीव मुदत मागे घ्या तसेच प्राइम मेंबरशिप आणि समर सरप्राइज ऑफरही मागे घेण्यासाठी आदेश दिले होते. जिओच्या धन धना धन या नव्या ऑफरद्वारे तुम्हाला तीन महिन्यांसाठी अमर्यादित डेटा मिळणार आहे, फ्री एसएम एस सर्व्हिस, जिओ अ‍ॅप सबस्क्रिप्शन मिळणार आहे. ही ऑफर मिळवण्यासाठी जिओ प्राइमचे सबस्क्रिप्शन घेऊन 309 आणि 509 रुपये भरणे आवश्यक आहे. ही ऑफर घेतल्यास दररोज 2 जीबी 4 जी डेटा वापरता येणार आहे. ज्या लोकांना जिओ समर सरप्राइज ऑफर वापरता येणार नाही त्यांच्यासाठी ही नवी ऑफर देण्यात येणार आहे. हॅप्पी न्यू इयर ऑफर संपेपर्यंत अपेक्षेएवढ्या ग्राहकांनी प्राइम मेंबरशिपसाठी नोंदणी न केल्याने जिओने प्राइम मेंबरशिपसाठी 15 दिवसांची मुदत वाढवली होती. जिओकडून सर्व ग्राहकांना दररोज 1 ॠइ मोफत डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती. 31 मार्च 2017 ही या ऑफरची अंतिम तारीख होती. मात्र, रिलायन्सने पुन्हा ही तारीख 15 एप्रिलपर्यंत वाढवून ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर दिली.तसेच जिओची प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा केली होती. तीन महिने मोफत डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांना 15 एप्रिलपूर्वी प्राईम मेंबरशिप घेणं गरजेचं करण्यात आलं होतं. 15 एप्रिल पर्यंत ज्या ग्राहकांनी या ऑफरसाठी प्राइम मेंबरशिपची नोंदणी करुन 303 रुपये भरले त्यांना तीन महिन्यांची सेवा मोफत मिळणार आहे. ट्रायच्या आदेशानंतर जुनी ऑफर त्यांना गुंडाळावी लागली परंतु नव्या धन धना धन ऑफर द्वारे तीच सेवा रिलायन्स जिओ पुरवणार आहे.