साडेसतरा वर्षे गृहखाते NCP कडे होते मात्र...; अजित पवारांनी फडणवीसांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 07:51 PM2022-11-14T19:51:55+5:302022-11-14T19:52:17+5:30

राज्याचे मुख्यमंत्री गाडीत बसले आहेत त्याच्या काही अंतरावर ही घटना घडली आहे. त्या गर्दीतून पुढे जाण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत हे दिसत आहे. त्यात कुठे आलाय विनयभंग असा संतप्त सवाल अजित पवारांनी केला.

Jitendra Awhad Controversy: NCP Leader Ajit Pawar Targets BJP and Devendra Fadnavis | साडेसतरा वर्षे गृहखाते NCP कडे होते मात्र...; अजित पवारांनी फडणवीसांना सुनावले

साडेसतरा वर्षे गृहखाते NCP कडे होते मात्र...; अजित पवारांनी फडणवीसांना सुनावले

googlenewsNext

ठाणे - पोलीस दबावाखाली वागत आहेत. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम केले आहे. १९९९ ते २०१४ लागोपाठ आम्ही पंधरा वर्षे सरकारमध्ये होतो. भुजबळ, आर. आर. पाटील आणि जयंत पाटील या तिघांकडे गृहमंत्री पद होते. साडेसतरा वर्षे गृहखाते राष्ट्रवादीकडे होते मात्र या खात्याचा गैरवापर होता कामा नये याची खबरदारी घेण्यात आली होती. त्यावेळी आदरयुक्त दरारा होता. अशाप्रकारचा अन्याय कुणावर होत नव्हता ही वस्तुस्थिती होती. जर यदाकदाचित कुणी प्रयत्न केला तर ज्याची चूक असेल त्याला तिथल्या तिथे खडसावले जात होते असं सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाडांवर दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यावर ते बोलत होते. 

अजित पवार म्हणाले की, चुकीच्या पद्धतीने लोकप्रतिनिधीला अडकवण्याचा प्रयत्न करु नका. चुकला असेल तर जरुर कारवाई करा पण चुकलेलं नसताना मुद्दामहून गोवण्याचा प्रयत्न करणार असाल, नाउमेद करण्याचा प्रयत्न करणार असाल, जनमानसातून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणार असाल तर हे लोकशाहीला अतिशय घातक आहे अशी नाराजी अजित पवारांनी व्यक्त केली. ७२ तासांत राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्र्यावर दोन - दोन गुन्हे दाखल होतात आणि या असल्या कारस्थानामुळे अतिशय नाराज होऊन जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देत असल्याचे ट्वीट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली काय नसली काय. नेहमी सर्वधर्मसमभाव व शाहू-फुले-आंबेडकराचे विचार सातत्याने पुढे नेणारा सहकारी या नात्याने महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. ज्या कारणाने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या क्लीपमध्ये कुठेही असा विनयभंग झाल्याचा दिसत नाही असंही अजित पवार म्हणाले

ही अतिशय लाजिरवाणी बाब
राज्याचे मुख्यमंत्री गाडीत बसले आहेत त्याच्या काही अंतरावर ही घटना घडली आहे. त्या गर्दीतून पुढे जाण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत हे दिसत आहे. त्यात कुठे आलाय विनयभंग असा संतप्त सवाल करतानाच आज सरकार बदललं आहे म्हणून काही विरोधकांचा आवाज अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे असं अजित पवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले. 

...म्हणून ठाण्यात आलो
माझ्या पक्षाच्या सदस्यावर अन्याय होत असेल तर त्यामागे काय वस्तुस्थिती आहे हे समजून घेण्यासाठी ठाण्यात आलो आहे. आव्हाड यांच्यासोबत चर्चा झाली. अगोदरचा गुन्हा देखील बघा. मारहाण झालेली व्यक्ती जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे वाचलो सांगत आहे. तरीदेखील जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या बारा सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन गुंतवण्याचा प्रयत्न होता. मात्र जसा-जसा वेळ जाईल तसा - तसा यामागचा सूत्रधार कोण आहे हे समोर येईल. कुणी त्या भगिनीला विनयभंगाचा गुन्हा दाखल करा सांगायला भाग पाडले आहे यामागे एक षडयंत्र आहे अशी शंका अजित पवारांनी उपस्थित केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Jitendra Awhad Controversy: NCP Leader Ajit Pawar Targets BJP and Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.