शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
3
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
4
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
5
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
6
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
7
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
8
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
9
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
10
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
11
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
12
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
13
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
14
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
15
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
16
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!
17
IND vs BAN : पहिल्या सामन्यात अश्विन-जड्डूची 'दादा'गिरी; गांगुली म्हणाला, "बांगलादेशने पाकिस्तानला..."
18
"पापा कहते हैं, "बड़ा नाम करेगा"; R Ashwin च्या वडिलांनी एन्जॉय केली लेकाची फटकेबाजी
19
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
20
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा

राज्य सरकारची कोकणातून पर्यटक पळवा योजना, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 5:42 PM

Jitendra Awhad : वार्‍याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो तर, आपणही वाहून जाऊ, उडू किंवा पडू या भीतीने पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली आहे, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

Jitendra Awhad : मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळल्याची घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. मात्र, अवघ्या आठ महिन्यात तो पुतळा कोसळल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. मात्र, ही दुर्घटना घडली, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली होती. त्या प्रतिक्रियेवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

वार्‍याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो तर, आपणही वाहून जाऊ, उडू किंवा पडू या भीतीने पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली आहे, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर केली आहे. "गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी आणि पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट! अवघ्या ४५ किमी ताशी वार्‍याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो; तर, आपणही वाहून उडू किवा पडू या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ !! राज्य सरकारची नवीन "कोकणातून पर्यटक पळवा योजना", असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केले आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री शिंदे ?राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, "छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्या दैवत आहेत. हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता. त्याठिकाणी ताशी ४५ किमी वेगाने एवढ्या जोरात वारा वाहत होता, त्यामुळे पुतळा पडला आणि नुकसान झाले. या घटनेमागील कारणे शोधून काढू आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारू."

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदे