सलग 20 दिवस पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच ठेवल्याने राजधानीत डिझेलची किंमत प्रथमच 80 रुपयांच्या पुढे गेली आहे. गुरुवारी दरवाढ करण्यात आल्याने डिझेलचे दर एका लिटरला 10.63 रुपयांनी वाढले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये डिझेलचे दर लिटरला 14 पैशांनी वाढून 80.02 रुपये असे झाले आहेत. प्रथमच डिझेलच्या दराने 80 रुपयांची पातळी ओलांडलेली दिसून आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे.
India-China बॉर्डरवरच्या भारतीय जवानाची देशवासीयांना साद; 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला Video
पेट्रोल आणि डिझेलवर विविध राज्य सरकारांकडून अबकारी कर तसेच व्हॅट यांची आकारणी केली जाते. त्यामुळे इंधनाच्या जाहीर झालेल्या दरांपेक्षा प्रत्येक राज्यामध्ये अधिक रक्कम ग्राहकांना मोजावी लागते. पेट्रोल व डिझेल हे जीएसटीखाली आणण्याची मागणी केली जात असली तरी अनेक राज्यांचा त्याला विरोध आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं की,'' बिग ब्रेकिंग, भारत सरकारचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय.. आता कच्चं तेल इराककडून खरेदी केलं जाणार नाही, तर जनतेचं तेल काढलं जाईल.''
मोहम्मद हाफिजच्या बंडानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं डोकं टाळ्यावर; घेतला मोठा निर्णय
वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी घडलं होतं असं काहीतरी...; विजय शंकरचा मोठा खुलासा