शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला खेद; विरोधकांना दाखवले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 12:38 PM

माझं भाषण चांगले झाले. पण एका वाक्याने भाषणाची दिशा बदलली. त्या वाक्याने लोकांची मने दुखावली गेली. त्यावर मी खेद व्यक्त करतो असं आव्हाडांनी म्हटलं.

अहमदनगर - Jitendra Awhad Statement ( Marathi News ) प्रभू राम जिथून गेले त्या गावचा माणूस मी आहे. त्यामुळे मला राम कुणी सांगू नये. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. मी पुरंदरेंच्या विरोधात बोललो तेव्हा मला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी माफी मागायला सांगितली होती. पक्ष कुणाची सामाजिक भूमिका ठरवू शकत नाही असं पवारांनी मला स्पष्ट सांगितले होते. मी एकटा लढतो. रोहित पवारांना मी फार महत्त्व देत नाही. अबुधाबीत जाऊन बोलणे सोपे आहे. कुठलेही भाष्य असते कार्यकर्त्यांनी पटतं ते घ्यावे आणि बाकी सोडून द्यावे. वाल्मिकी रामायणात जे लिहिलंय ते मी बोललो. लोकभावनेचा आदर करतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त विधानावर दिले आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय करत नाही. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा. मी जे बोलतो त्याचे पुरावे देतो. वाल्मिकी रामायणाचे मी पुरावे देऊन बोललो. सत्य कडू असले तरी लोकांच्या भावना दुखावू नये असं मला शिकवण्यात आलंय. त्यामुळे मी खेद व्यक्त करतो. कधी कधी भाषणाच्या ओघात बोलले जाते. मुलींना उचलून नेण्याची भाषा करणारे आज माझ्यावर बोलतायेत. माझ्या विधानाचा पक्षाशी संबंध नाही. मीदेखील रामभक्त आहे. आमचा राम सर्वांचे भले करणारा आहे. राम बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार बघून पुन्हा जाईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच माझं भाषण चांगले झाले. पण एका वाक्याने भाषणाची दिशा बदलली. त्या वाक्याने लोकांची मने दुखावली गेली. त्यावर मी खेद व्यक्त करतो. मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो. श्रीराम मांसाहारी होते असं मी बोललो. हा वाद मला वाढवायचा नाही. पण जे याविरोधात उभे राहिलेत त्यांच्या माहितीकरता, वाल्मिकी रामायणात जे अयोध्या कंद यातील खंड २२, श्लोक १०२ यात लिहिलंय. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. भाषांतरीत केलेले संदर्भ आहेत. रामायणात जे लिहिलंय त्यावर कुणाचा आक्षेप आहे का तर ते सांगावे. अभ्यासाशिवाय मी कुठलेही भाष्य केलेले नाही. पण आजकाल अभ्यासाला महत्त्व नाही तर भावनांना महत्त्व आहे. त्यामुळे जर माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. 

दरम्यान, नितेश राणे वाचतात किती, बोलतात किती हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. माझ्याकडे सगळे पुरावे उपलब्ध आहेत. ज्यांना लॉजिकली भांडायचे नसते त्याला अशाप्रकारे अटक करा, जेलमध्ये टाका बोलत असतात. आम्हा बहुजनांचा तो राम आहे. तुम्ही आमच्या रामाचे अपहरण करताय. जातीपाती न मानणारा राम आहे. सर्व जनता सुखी असावी हा आमचा राम आहे. राम हृदयात आहे. तुम्हाला आमचा राम निवडणुकीच्या बाजारात मांडायचा आहे पण आमच्या हृदयात राम जन्मापासून आहे. दरवर्षी मी रामाच्या दर्शनाला पंचवटीला जातो. त्यामुळे मला रामाबद्दल कुणी सांगायचा प्रयत्न करू नका अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी भाजपावर निशाणा साधला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडBJPभाजपा