नशीबाने मी तुम्ही बाजुला व्हा म्हणून बाजुला केले. उद्या जर त्या माझ्या अंगावर पडल्या असत्या तर मी काहीही बचाव करू शकलो नसतो. देवाने मला वाचविले, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर दिली. यानंतर आव्हाड यांनी या महिलेवर गंभीर आरोप केले. एक दिवस ही महिला मुंब्र्याला आग लावल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनी तक्रारदार महिलेवर टीका केली आहे.
Jitendra Awhad Video: ती माझ्या अंगावर पडली असती तर...; जितेंद्र आव्हाडांनी केले गंभीर आरोपएवढ्या गर्दीत एकटी महिला कधी येत नाही. तिच्या डोक्यात आधीच प्लॅन होता. ती मुद्दामहून समोरून चालत येत होती. हा पूर्वनियोजित कट होता. एवढे नीच राजकारण ही महिला मुंब्र्यात आल्यानंतर सुरु झालेय. छट पुजेत असेच कांगावे केले. तिचा व्हिडीओ व्हायरल झालाय. तिने अनेक पुरुषांना त्रास दिला आहे. आरएसएसचे पुराणिक म्हणून आहेत, तिने त्यांचे काय केलेय हे पहा. हे तिचे हक्काचे प्रयोग आहेत. ही महिला एके दिवशी मुंब्र्याला आग लावेल, याचे आज मी भाकीत करतोय, अशी टीका आव्हाड यांनी केली.
अनेक महिला हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या माझ्याबाजुने उभ्या राहिल्या. अंजली दमानियांशी आमच्या वेगळ्या लढाया असतात. जितेंद्र आव्हाड असे काही करेल यावर विश्वास बसत नाही या भगिनींच्या भावना सुखावणाऱ्या आहेत, अशा शब्दांत आव्हाड यांनी आभार मानले. प्रीती शर्मा मेनन सारख्या महिलांशी आमचे विविध गोष्टींवरून वाद आहेत. या सर्व महिला माझ्या बाजुने उभ्या राहिल्या. मी काय कमावले, हेच कमावले, असे सांगत आव्हाड भावूक झाले.
मुंबईतील दहा महिला कार्यकर्त्या हायकोर्टात याविरोधात दाद मागणार आहेत. ज्या पद्धतीने पोलीस वागतायत ते वाईट आहे. शपथ घेताना जे म्हटलेले त्यानुसार वागायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही सरकारचे नोकर नसता. सरकारी नोकर असता, यामुळे कायद्यानेच वागले पाहिजे होते, असेही आव्हाड म्हणाले.