मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात एनआरसी व सीएए विरोधी कृती समिती पैठण च्या वतीने सोमवारी पैठण शहरातून रँली काढण्यात आली होती. रँलीचा समोराप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खंडोबा चौकातील जाहिर सभेत मार्गदर्शन करून केला. मात्र यावेळी त्यांच्या भाषणाचे चित्रीकरण करणाऱ्या पोलिसावर आव्हाड चांगलेच भडकले असल्याचे पाहायला मिळाले.
राज्यभरातील विविध जिल्ह्यात काढण्यात येत असलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनात जितेंद्र आव्हाड हजेरी लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या सिल्लोड आणि पैठण येथे सोमवारी काढण्यात आलेल्या एनआरसी व सीएए विरोधातील रँलीत आव्हाड सहभागी झाले होते. तर या दोन्ही रँलीचा समोराप जितेंद्र आव्हाड यांनी जाहिर सभेत मार्गदर्शन करून केला.
पैठण येथे भाषण करत असतानाचं तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांपैकी एक कर्मचारी आव्हाड यांच्या भाषणाचे चित्रीकरण करत असल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यावेळी मध्येच भाषण थांबवून आव्हाड यांनी त्या पोलिस कर्मचाऱ्याला झापत चित्रीकरण बंद करण्याचे सांगितेले.
आव्हाड भाषण करत असताना त्यांच्या समोर असलेल्या गर्दीतून एक पोलीस कर्मचारी त्यांचे भाषण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. आव्हाड यांच्या लक्षात येताच, त्यांनी त्या कर्मचारीला आवाज देत म्हणाले, "अरे बाबा मी सत्तेतील मंत्री आहे. माझ भाषण काय रेकॉर्ड करतो. बंद करा ते शुटींग असे म्हणत आव्हाड पोलिसावर चांगलेच भडकले. आता काही फडणवीसांच सरकार राहिले नाही, असे म्हणत त्यांनी पोलिसाला चित्रीकरण बंद करायला लावले.