शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

Jitendra Awhad : "...मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट"; गोळीबारावरून जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 10:21 AM

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. याच दरम्यान, हल्लेखोर मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "महाराष्ट्र सरकारची अभिनव योजना मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"सरकार कुणाचंही असो पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल युपी/बिहारच्या दिशेने होणं ही इथल्या प्रत्येकासाठी शरमेची बाब आहे. जिथे राजकीय नेत्यांवर उघडपणे गोळीबार होतोय तिथे जनतेच्या सुरक्षेची काय गॅरंटी असणार..?" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "महाराष्ट्राचा बिहार झाला, असे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. कारण, महाराष्ट्राने बिहारला खूप मागे सोडलं आहे. गुंडांनी जणू काही महाराष्ट्र आपल्या मुठीत बंदिस्त करून टाकला आहे. हतबल सरकार उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहतंय."

"पोलिसांची दहशतच संपली आहे. पोलीस दलात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. पोलिसांवर फक्त विरोधकांना संपवण्याची जबाबदारी आहे; कायदा आणि सुव्यवस्था गेली खड्ड्यात!  दुर्देवं आहे, महाराष्ट्राचे! इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही. जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतेय; जनतेमधील रोष वाढतोय. पण, लोकांचा जीव जाणे, याला सरकारच जबाबदार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे. परवा कल्याण, आज मुंबई... अजून काय माहित किती घटना घडणार आहेत? कधी पुणे, कधी ठाणे तर कधी मुंबई  खुनांचा थरार सुरूच आहे."

"महाराष्ट्रात लागोपाठ उघडपणे गोळीबाराच्या घटना घडणं, ही अतिशय गंभीर बाब आहे. ‘सागर’ बंगल्यावर बसलेल्या गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो. सरकार कुणाचंही असो पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल युपी/बिहारच्या दिशेने होणं ही इथल्या प्रत्येकासाठी शरमेची बाब आहे. जिथे राजकीय नेत्यांवर उघडपणे गोळीबार होतोय तिथे जनतेच्या सुरक्षेची काय गॅरंटी असणार..?" असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाFiringगोळीबारAbhishek Ghosalkarअभिषेक घोसाळकर