शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पर्रीकरांबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 12:15 AM

मनोहर पर्रीकर यांच्याबाबत मी केलेल्या विधानाचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला, अशी सारवासारव राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मुंबई -  मनोहर पर्रीकर यांच्याबाबत मी केलेल्या विधानाचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला, अशी सारवासारव राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मनोहर पर्रीकर हे राफेल विवादातील पहिले बळी आहेत, असे आव्हाड यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटले होते. गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले होते. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाशी झुंजत होते. दरम्यान, पर्रीकर यांच्या मृत्यूबाबत बोलताना आव्हाड यांनी मनोहर पर्रीकर हे राफेल विवादातील पहिले बळी आहेत, असे म्हटले होते. मात्र आव्हाड यांनी आपल्या या वक्तव्याबाबत आता स्पष्टिकरण दिले आहे. ते म्हणाले की,'' मी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेचा विपर्यास करण्यात आला. माझ्या ज्या प्रतिक्रियेचा विपर्यास करण्यात आला आहे. तीच प्रतिक्रिया मी खोलवर देत आहे.  रविवारी दुपारी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे र्ककरोगाशी झुंज देताना निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक प्रामाणिक राजकारण्याची उणीव निर्माण झाली आहे. त्यांची माझी ;चार ते पाच वेळा भेट झाली होती.  कधी विमानतळावर.. कधी विमानात तर कधी गोव्यात मी त्यांना भेटलो होतो. हसतमुखं, निर्गवी  असलेले हे व्यक्तीमत्व पुस्तकात रममान झालेले असायचं. त्यांच्याशी थोडंस बोलणं झालं की ते पुन्हा पुस्तकात रममान व्हायचे. आयआयटीमध्ये शिक्षण झालेले ते अभ्यासू राजकारणी होते.'' 

''ठाण्यात त्यांचा एक वर्गमित्र राहतो. त्यांच्या वर्गमित्राशी चर्चा करताना पर्रिकर यांच्या मिनमिळाऊ स्वभावाची अनेकदा आठवण निघायची.  पर्रिकर यांच्या कपड्यांवरुन त्यांच्या राहणीमानाची कल्पना यायची. साधारणसा शर्ट आणि साधारणशी पँट ते वापरायचे. पायात कधी साधी चप्पल तर कधी सँडल असयाचे. एकदा एका फोटोग्राफरने त्यांच्या तुटलेल्या चप्पलेसह त्यांचा फोटो काढला. मात्र, पर्रिकर यांनी लगेच त्या फोटोग्राफरला सांगून हा फोटो छापू नकोस, अशी सूचना केली. तो फोटो कधीच कुठे प्रसिद्ध झाला नाही. साधे राहणीमान असलेले पर्रिकर हे दिल्लीत गेले.  तेथे त्यांच्या खांद्यावर संरक्षणमंत्रीपदाची धुरा देण्यात आली. त्यांनी आपली ही जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडली. जो पर्यंत त्यांना बंगला मिळाला नाही. तोपर्यंत ते नौदलाच्या विश्रामगृहात राहिले. एकीकडे अनेक मंत्री फाईव्हस्टार हॉटेलात रहात असताना पर्रिकर हे मात्र, एका रेस्ट हाऊसमध्ये राहिले होते.''असेही आव्हाड यांनी सांगितले. 

पर्रीकर आणि राफेलसंदर्भात भाष्य करताना त्यांनी सांगितले की, ''राफेलच्या संदर्भात जस-जसे आवाज उंचावू लागला. तस-तसे ते अस्वस्थ होऊ लागले. त्यातूनच ते गोव्याला रवाना झाले. आजपर्यंत राफेलच्या प्रकरणात अनेकांवर आरोप झाले. मात्र, पर्रिकरांच्या नावाचा उल्लेखही कोणी केला नाही. यावरुनच त्यांच्या सच्चाईची आणि सचोटीची ओळख पटते.  मात्र, हा तणावच त्यांच्या शरीराला अपायकारक ठरत गेला. हा तणावच त्यांच्या शरीराला मारक ठरला. त्यातच त्यांना देवाज्ञा झाली अन् एका चांगल्या प्रामाणिक राजकारणी व्यक्तीमत्वाला हा देश मुकला. आज देशभर राफेलचा धुरळा उडत असतानाही त्याची साधी धूळही पर्रिकरांच्या जवळपासही गेली नाही.  राफेलची बोलणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सला गेले. पण , संरक्षण मंत्री असतानाही पर्रिकर हे या वाटाघाटींमध्ये सहभागी झाले नाहीत. यावरून पर्रिकर यांच्यातील प्रामाणिकतेची साक्ष पटते. त्यानंतर ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यांच्या मनातील ही अस्वस्थता त्यांनी आपल्या अनेक मित्रांजवळ बोलूनही दाखवली होती.  या प्रामाणिक व्यक्तिमत्वाला मी आदरांजली अर्पण करतो.'' 

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडManohar Parrikarमनोहर पर्रीकरRafale Dealराफेल डील