सुशांत कुंकळयेकर - मडगाव
बिच टुरिझम व नाईट लाईफपुरते मर्यादित असलेल्या गोव्याच्या पर्यटनाने यंदा प्रथमच ख:या अर्थाने पाऊस ‘कॅश’ करायचा ठरविला आहे. गोवा पर्यटन महामंडळ यंदा देश-विदेशांतील पर्यटकांना गोव्यातील पाऊस ‘विकणार’ आहे. गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे नाहीत, तर येथील निसर्गसौंदर्यही तेवढेच लोभसवाणो आहे, हे पर्यटकांना पटवून देण्यात येत आहे.
पश्चिम घाटातील हिरवाई हा आमचा यंदाचा यूएसपी आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी दिली. यंदा आम्ही पर्यटकांना गोव्यातील पावसाच्या प्रेमात पाडणार आहोत. फॉरेस्ट रिसॉर्ट व साहसी पर्यटन क्षेत्रही पर्यटकांना खुले करणार आहोत, असेही ते म्हणाले.
हनिमुन कपल्सना आकर्षित करण्यासाठी पर्यटन महामंडळाने खास पॅकेजेस जाहीर केली आहेत. खळाळणा:या समुद्राच्या कडेवर असलेला आग्वादचा किल्ला, धो धो वाहणारा दूधसागर धबधबा, दक्षिण गोव्यातील साळावलीचे धरण याशिवाय हिरवीगार शेते आणि वनराईने नटलेले डोंगर यांचा पर्यटनासाठी पुरेपूर उपयोग करून घेण्याचे सरकारने ठरविले आहे.
पावसाळ्यात विमान प्रवासाचे कमी झालेले दर आणि हॉटेल्समध्ये मोठय़ा प्रमाणावर मिळणारे डिस्काऊंट यामुळेही पर्यटक आकर्षिक होत आहेत.
उन्हाळ्यात गोव्यात ज्याप्रमाणो सन बर्न आयोजित केले जाते
त्याच धर्तीवर ‘गोवा रॉक्स अॅण्ड रेन’ ही संकल्पना आम्ही पुढे आणत
असून, पावसाळ्यात येणा:या सांज्युआंव व बोन्देरा या दोन
सणांची सांगड मेगा फेस्टिव्हलशी घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे जास्तीतजास्त
पर्यटक पावसात गोव्यात येतील, असे पर्यटन व्यावसायिक राल्फ डिसोझा म्हणाले.
च्गोवा पर्यटन महामंडळाने
जगातील प्रमुख विमानतळांवर पावसाळी पर्यटनाचे पोस्टर्स लावले आहेत, असे पर्यटन महामंडळाचे संचालक निखिल देसाई यांनी सांगितले.
च्गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदा गोव्यात पर्यटकांची संख्या आठ टक्क्यांनी वाढली आहे. शिवाय पर्यटकांनी 80 टक्के हॉटेल्स भरल्याचे दिसून येत आहे.
च्दिल्लीसारख्या गरम हवेच्या ठिकाणच्या पर्यटकांना आम्ही पावसात गोव्याकडे आकर्षित करत आहोत, असेही देसाई यांनी सांगितले.