शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

एसटी महामंडळात होणार जम्बो भरती

By admin | Published: September 20, 2016 5:02 AM

एसटी महामंडळात येत्या काही महिन्यांत जम्बो भरती केली जाण्याची शक्यता आहे

मुंबई : एसटी महामंडळात येत्या काही महिन्यांत जम्बो भरती केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत महामंडळात रिक्त जागा भरल्या न गेल्याने तब्बल १५ हजार जागा रिक्त आहेत. यात चालक-वाहकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. या जागा भरण्यासाठी एसटी महामंडळाने भरती प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीशीही बोलणी सुरू केली आहे. २0१४ मध्ये एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. त्यानंतर महामंडळात भरती प्रक्रिया झाली नाही. दोन वर्षांत एकही जागा भरली न गेल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त झाल्या. एसटी महामंडळासाठी वर्ग-१ ते वर्ग-४ साठी १ लाख २६ हजार ११५ जागा मंजूर असून यात १ लाख ४ हजार ३९८ मनुष्यबळच सध्या कार्यरत आहे. हे पाहता सुमारे २२ हजार जागाच रिक्त असून यामध्ये ६ हजार ९0२ ही बढतीतील पदे तर १५ हजार १२२ सरळ सेवेतील परीक्षा घेऊन भरण्यात येणारी पदे समाविष्ट आहेत. बढती प्रक्रियेतील पदे भरण्याचे काम एसटी महामंडळाकडून सुरू आहे. सरळ सेवेत असणाऱ्या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागीर, साहाय्यक कारागीर यांची पदे मोठी असल्याचे महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या ३६ हजार ७३२ चालक असून आणखी २ हजार ९७७ चालकांची गरज आहे. तर ३४ हजार ८0७ वाहक कार्यरत असून आणखी ३ हजार ९६३ वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागीर, साहाय्यक कारागीर यांचीही ५ हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-४ मधील अन्य काही पदेही रिक्त आहेत. कंपनीला भरती प्रक्रियेचे काम दिले जाईल, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)>अधिकारी वर्ग १ आणि २ चीही ९३३ पदे मंजूर आहेत. यात प्रत्यक्षात ५५२ पदे भरलेली असून ३८१ रिक्त जागा आहेत. रिक्त जागा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एसटी महामंडळाने ठेवले आहे. >कंपनी नियुक्त करणार : भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्यात करायची की नाही, याबाबतचा निर्णय सर्वतोपरी एसटी महामंडळाकडून घेतला जाणार आहे. त्याआधी भरती प्रक्रिया राबवणाऱ्या कंपनीचीही नियुक्ती केली जाईल. >महत्त्वाची रिक्त पदेपदेमंजूरकार्यरतरिक्तचालक३८,८२५३६,७३२२,९७७वाहक३७,९१0३४,८0७३,९६३कारागीर७,६९९४,४६२३,२0२सहा.कारागीर६,९८५४,७३४२,२१३