सुवर्णा नवले-गवारे , पिंपरीमहापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व पटसंख्या गळती कमी व्हावी, या उद्देशाने ‘शाळा गुणवत्ता विकसन प्रकल्प २०१५-१६’ राबविण्यात येत आहे. निगडीतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून, महापालिकेच्या १० शाळा गुणवत्तावाढीसाठी दत्तक घेतल्या आहेत. ज्ञान प्रबोधिनीचे तज्ज्ञ शिक्षक या १० शाळांत जाऊन रोज दोन तास विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय सोपा करून सांगत आहेत. मनपा शाळा गुणवत्ता विकसन प्रकल्पाची सुरुवात १५ आॅगस्टला झाली आहे. प्रत्येक शिक्षकाकडे आठ महिन्यांचे ६४ तासांचे अभ्यासवर्ग आहेत. दोन वर्षांच्या कालावधीकरिता हा प्रकल्प राबविला जाणार आहे. खासगी शाळांप्रमाणेच महापालिका शाळांची गुणवत्ता वाढणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाने दत्तक शाळांसाठी व्यवस्थापन समिती, सहविचार समिती व समन्वयकाची समिती स्थापना केली आहे. संबंधित शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, पालक समाधान व्यक्त करीत आहेत, असे निगडीतील ज्ञान प्रबोधिनी केंद्राचे उपप्रमुख मनोज देवळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गुणवत्तावाढीसाठी ज्ञान प्रबोधिनीचा उपक्रम
By admin | Published: November 15, 2015 2:20 AM