कोल्हापूर : केरळ, आसाम, बांगलादेश येथील मुलींना नोकरीचे आमिष दाखवून मुंबई, पुणे, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर या शहरांत वेश्या व्यवसाय करायला लावले जात असे, अशी कबुली मुंबईतील एजंट नबकुमार बोलाईचरण मायत्ती (३५, रा. उल्हासनगर, ठाणे) याने चौकशीत दिली आहे. त्याच्यासह चौघा आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आसाम येथील पीडित पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय तपासणी करून बालकल्याण संकुलमध्ये रवानगी केली; तर स्थानिक पीडित महिलेला तेजस्विनी महिला सुधारगृहात पाठविले. चौकशीमध्ये सेक्स रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. इंडियन रेस्क्यू मिशन (बेळगाव) या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने साळोखे पार्क येथील आलिशान बंगल्यात राजरोसपणे सुरू असलेल्या हाय-फाय वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. यावेळी कुंटणखाना चालविणाऱ्या नराधमांच्या ताब्यातून आसाम येथील पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली. मुंबईचा एजंट संशयित नबकुमार मायत्ती याच्यासह अनिल ऊर्फ जॉन विजय पाटील (३३, रा. जयसिंगपूर), दिनेश दानय्या स्वामी (३३), त्याची पत्नी पूजा (२८, दोघे रा. साळोखे पार्क) यांना पोलिसांनी अटक केली. एजंट नबकुमार मायत्ती हा परराज्यांतील अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना वाममार्गाला लावीत असे. आसाममधील पीडित मुलीला त्याने अशीच फूस लावून वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले. अशा अनेक पीडित मुलींना त्याने फसवून आणून जबरदस्तीने वाममार्गाला लावले आहे. या प्रकरणी तपासाची व्याप्ती वाढत आहे. शहरात आणखी कुठे अशा पद्धतीने व्यवसाय चालतो, त्याची माहितीही पोलिस घेत आहेत. (प्रतिनिधी)मुंबईच्या एजंटाची कबुलीआसामच्या मुलीची बालकल्याण संकुलामध्ये रवानगीउच्चभ्रू वेश्या अड्ड्यातील आरोपींना कोठडी
नोकरीच्या आमिषाने मुलींची तस्करी उघड
By admin | Published: March 29, 2017 12:57 AM