शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

नियुक्तीपत्र मिळूनही बँकेतील नोकरी हातून गेली

By admin | Published: March 07, 2016 3:30 AM

निवड प्रक्रियेत यशस्वी ठरून नियुक्तीपत्रे दिलेले पाच उमेदवार मुळात त्या पदासाठीच्या शैक्षणिक अर्हतेच्या निकषात बसत नाहीत, या कारणावरून या उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे

मुंबई: निवड प्रक्रियेत यशस्वी ठरून नियुक्तीपत्रे दिलेले पाच उमेदवार मुळात त्या पदासाठीच्या शैक्षणिक अर्हतेच्या निकषात बसत नाहीत, या कारणावरून या उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे तीन राष्ट्रीयीकृत बँकांचे निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने योग्य ठरविले आहेत.युनियन बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया व ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स या बँकांनी या उमेदवारांना नोकरी न देण्यात काहीच गैर नाही. मुळात जाहिरातीमध्ये दिलेल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये आपण बसत नाही, हे माहीत असूनही या उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यामुळे जाहिरात दिलेल्या पदासाठीच्या शैक्षणिक अर्हतेत ते बसत नाहीत, हे कोणत्याही टप्प्यास निदर्शनास आल्यावर त्यांना नोकरीत न घेण्याची बँकांची कृती योग्यच ठरते, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला.पल्लवी सदाशिव बांडे व सचिन शांताराम ठेंगे (दोघे जि. औरंगाबाद), चंद्रकांत वासुदेव ढाकणे (जि. बीड), योगेश ओमप्रकाश घण (जि. परभणी) आणि सोपान रामचंद्र देवकर (जि. जळगाव) या पाच उमेदवारांनी केलेल्या याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील न्या. एस. एस. शिंदे व न्या. पी.आर बोरा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.विविध राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचारी भरतीचे काम करणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट आॅफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन’ने दोन वर्षांपूर्वी विविध पदे भरण्यासाठी जाहिरात दिली होती. या पाच उमेदवारांनी त्यापैकी ‘अ‍ॅग्रीकल्चरल आॅफिसर’ या पदासाठी आॅनलाइन अर्ज केले. लेखी परीक्षा व तोंडी मुलाखतीत यशस्वी ठरल्यावर पल्लवी, सचिन व योगेश यांना युनियन बँकेकडून, चंद्रकांतला सेंट्रल बँकेकडून, तर सोपानला ओरिएंटल बँकेकडून निवड झाल्याचे पत्र आले व त्यांना ‘प्री इंडक्शन’ प्रशिक्षणासाठी जाण्यास सांगण्यात आले. मात्र, प्रशिक्षणासाठी जाण्याआधीच बँकांकडून त्यांना पुन्हा पत्रे आली व शैक्षणिक अर्हतेच्या निकषांत बसत नसल्याने, आधी दिलेले नियुक्तीपत्र मागे घेतल्याचे कळविले गेले.हे पाचही उमेदवार राज्याच्या विविध कृषी विद्यापीठांमधून बी.एससी (अ‍ॅग्रो-बायोटेक) ही पदवीपरीक्षा उत्तीर्ण झालेले होते. जाहिरातीत या पदासाठी जी शैक्षणिक अर्हता दिली होती, त्यात या पदवीचा समावेश नव्हता. उमेदवारांचे म्हणणे असे की, राज्यात ही पदवी बी.एससी (अ‍ॅग्री) या पदवीशी समकक्ष मानली गेली आहे. शिवाय सर्व निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिलेले नियुक्तीपत्र रद्द करणे अन्याय्य आहे. यावर बँकांचे म्हणणे असे होते की, सर्व प्रक्रिया आॅनलाइन झाली होती. उमेदवारांनी सादर केलेल्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची जेव्हा प्रत्यक्ष छाननी केली गेली, तेव्हा त्यांची अर्हता जाहिरातीनुसार नाही, हे लक्षात आले. (विशेष प्रतिनिधी)