नाशिक : मलेशियात चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एका महिलेने दोन युवकांची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून, सरकारवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे़नवीन सीबीएस येथील सियाराम मरीन मॅनेजमेंट सेंटर ही सरकारमान्य संस्था असल्याचे सांगून संशयित कल्पना दामोदर घवाले हिने अझरुद्दीन इसाक पिलार (२२, रा़ दाळींब उमरगा, जि़ उस्मानाबाद) व त्याच्या साथीदारास मलेशियात चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखविले़ आॅक्टोबर २०१४ ते फेबु्रवारी २०१६ या कालावधीत पिलार व त्याच्या साथीदाराकडून घवाले हिने एक लाख ४५ हजार रुपये घेऊन मलेशियात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले़ मात्र पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिलार व त्याच्या साथीदाराने सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ घवालेकडून आणखी काही युवकांची फसवूणक झाल्याचा पोलिसांना संशय आहे. (प्रतिनिधी)
परदेशात नोकरीचे आमिष; बेरोजगारांची फसवणूक
By admin | Published: May 22, 2016 4:10 AM