कल्याण : समाजकल्याणअंतर्गत शिक्षण विभागात लिपिकपदावर नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून एका भामट्याने सहा जणांना २० लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये दोन डॉक्टरही आहेत. डॉ. भूषण कुलकर्णी यांना सप्टेंबर २०१४ पासून प्रवीण सूर्यवंशी (३०, रा. कृष्ण विहार सोसायटी, पळस्पे, पनवेल) याने समाजकल्याणअंतर्गत शिक्षण विभागात नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवले. त्यांच्यासोबत कुलकर्णी यांचे नातेवाईक विजय कुलकर्णी, योगेश जोशी, भूषण चंद्रात्रे, डॉ. प्रकाश वाघ व रामा राऊत यांचीही फसवणूक सूर्यवंशी याने केली आहे. त्याने त्यांच्याकडून प्रत्येकी चार लाख असे एकूण २० लाख घेतले. मात्र, एकालाही नोकरी लावली नाही की, पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याने त्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
नोकरीच्या प्रलोभनाने २० लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2016 3:57 AM