सातारा : शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांना ‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये नोकरी देण्याची, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करण्याची ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी दिली. महाडिक यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांनी कौटुंबिक परिस्थितीची माहिती घेतली.सातारा तालुक्यातील पोगरवाडी या कर्नल संतोष महाडिक यांच्या मूळ गावी पवार यांनी मंगळवारी भेट दिली. त्यांच्यासमवेत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, नागरिकांशी नाते जोडणारे कर्नलकर्नल महाडिक यांच्या लष्करातील सहकाऱ्याने सांगितले की, कुपवाडामध्ये दुसऱ्यांदा सेवा बजावत असल्यामुळे कर्नल महाडिक यांना परिसराची आणि सीमावर्ती भागातील नागरिकांची चांगली माहिती होती. तेथील समस्यांचे निराकरण करण्याचा ते प्रयत्न करीत असत. ‘पलीकडून येणाऱ्यांकडे आम्ही पाहून घेऊ. तुम्ही त्यांना सहकार्य होईल असे काही करता कामा नये,’ असे ते सांगत. नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील काही शिक्षकांना तेथे नेले होते. शेती, पाऊसपाण्याचीही विचारपूसकर्नल संतोष महाडिक यांचे दोन्ही बंधू काय व्यवसाय करतात, घरची शेती किती, पाण्याची सोय आहे का, पोगरवाडीत पाऊसपाण्याचे प्रमाण कसे आहे, याचीही माहिती शरद पवार यांनी घेतली. ‘कर्नल संतोष महाडिक यांचे १०४ वर्षांचे आजोबा जयपूरला गिरणीत नोकरीस होते आणि संतोष यांनी त्यांना या वयात मुंबई, दिल्ली, बंगलोर येथे फिरावयास नेले होते,’ अशी माहिती कुटुंबीयांनी पवार यांना दिली.लहानग्यांना जवळ बोलावलेकर्नल संतोष यांचा सहा वर्षांचा मुलगा स्वराज आणि अकरा वर्षांची मुलगी कार्तिकी यांना शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांनी सर्वप्रथम जवळ बोलावले. कुटुंबीयांशी बोलणे होईपर्यंत कार्तिकी ही पवार यांच्या मागे उभी होती तर स्वराजला शशिकांत शिंदे यांनी जवळ घेतले होते.नागरिकांशी नाते जोडणारे कर्नलकर्नल महाडिक यांच्या लष्करातील सहकाऱ्याने सांगितले की, कुपवाडामध्ये दुसऱ्यांदा सेवा बजावत असल्यामुळे कर्नल महाडिक यांना परिसराची आणि सीमावर्ती भागातील नागरिकांची चांगली माहिती होती. तेथील समस्यांचे निराकरण करण्याचा ते प्रयत्न करीत असत. ‘पलीकडून येणाऱ्यांकडे आम्ही पाहून घेऊ. तुम्ही त्यांना सहकार्य होईल असे काही करता कामा नये,’ असे ते सांगत. नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील काही शिक्षकांना तेथे नेले होते. शेती, पाऊसपाण्याचीही विचारपूसकर्नल संतोष महाडिक यांचे दोन्ही बंधू काय व्यवसाय करतात, घरची शेती किती, पाण्याची सोय आहे का, पोगरवाडीत पाऊसपाण्याचे प्रमाण कसे आहे, याचीही माहिती शरद पवार यांनी घेतली. ‘कर्नल संतोष महाडिक यांचे १०४ वर्षांचे आजोबा जयपूरला गिरणीत नोकरीस होते आणि संतोष यांनी त्यांना या वयात मुंबई, दिल्ली, बंगलोर येथे फिरावयास नेले होते,’ अशी माहिती कुटुंबीयांनी पवार यांना दिली.
वीरपत्नीला नोकरी; मुलांना शिक्षण!
By admin | Published: November 24, 2015 11:47 PM