मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या ४२ व्यक्तींच्या नातेवाइकांना एसटी महामंडळात नोकरी देण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक कुटुंबास १० लाख रुपयांची आर्थिक मदत शासन देईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. आधीच्या सरकारने ही घोषणा केलेली होती; पण अंमलबजावणी झालेली नव्हती ती आता केली जाईल, असे ते म्हणाले. मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कायम राहतील. त्यांच्या नेतृत्वात समिती चांगले काम करत आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या नातेवाइकांना नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 5:23 AM