लोकमत न्यूज नेटवर्कमिरज (जि. सांगली) : जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी ८ प्रवाशांचा तब्बल ११ लाखांचा ऐवज लंपास केला. या चोरीबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.गुरुवारी पहाटे मिरजेकडे येणाऱ्या जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेसमध्ये एस-चार, पाच, सहा व आठ या आरक्षित बोगीत झोपलेल्या प्रवाशांच्या पर्स व बॅगा चोरट्यांनी चोरून नेल्या. लोणावळा ते पुणेदरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. पुणे स्थानक सोडल्यानंतर बॅगा चोरीला गेल्याचे लक्षात आले, तेव्हा गोंधळ उडाला.
जोधपूर-बंगळुरू एक्स्पे्रेसमधून ११ लाखांचा ऐवज लंपास
By admin | Published: June 16, 2017 12:45 AM