शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, लोकमतचा रविवारी हेल्दी बेबी कॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 3:40 AM

हेल्दी बेबी कॅम्प ही जागृती करणारी संकल्पना घेऊन जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व लोकमत एक भव्य कॅम्पचे आयोजन करीत आहे.

ठाणे : हेल्दी बेबी कॅम्प ही जागृती करणारी संकल्पना घेऊन जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व लोकमत एक भव्य कॅम्पचे आयोजन करीत आहे. सुदृढ, निरोगी बाळ हे प्रत्येक मातापित्याचे स्वप्न असते. चांगली व स्वस्थ मुले, निरोगी कुटुंब, जाणकार समाज आणि समृद्ध भारत अशी टप्प्याटप्प्याने विकसित होणारी आपली संस्कृती आणि त्यात घडवणे ही मोठी जबाबदारी जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या भारतातील सर्वाधिक मातांचा लाडका ब्रॅण्ड आणि आपली सामाजिक बांधीलकी जपतजपत क्रांती घडवणारे वृत्तपत्र म्हणजे लोकमत यांनी या दृष्टीने हे पाऊल उचलून एक वेगळी संकल्पना ठेवली आहे. १०० हून अधिक वर्षांसाठी जॉन्सन बेबी हे बाळाच्या शुश्रूषाविज्ञानामध्ये आघाडीवर राहिले आहे. हा वारसा प्रदीर्घ आहे, ज्यातून पिढी-दरपिढी प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला दिलेला विश्वासाचा स्पर्श आहे. असा स्पर्श जो जोपासतो बाळाचे आरोग्य, बाळाचे निरोगीपण आणि मातापित्याचा अतूट विश्वास आणि म्हणूनच जॉन्सनचे उत्पादन आईच्या मातृत्वावर आणि विज्ञानाच्या आधारावर निर्माण करण्यात आले असून जगभरातील हजारो मतांद्वारे खऱ्या अर्थाने घरांमध्ये चाचणी केली जाते, ज्यावर असतो मातेचा संपूर्ण विश्वास. ज्या विश्वासावर तर बाळ घडत जातं. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन आणि लोकमत वृतपत्रसमूहाने आयोजित केलेला हा कॅम्प एका निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होय. अशा प्रकारचे आयोजन सातत्याने केले जाते. मागील वर्षी पण अशा पद्धतीचे कार्यक्रम संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रात राबवले गेले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून हेल्थ जागृती वाढवून येणाऱ्या पिढीला संजीवनी देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमामार्फत होणार आहे, हे निश्चित. तेव्हा, या कार्यक्रमाला जास्तीतजास्त संख्येने सहभागी होऊन जागरूक पालकांची भूमिका निभावण्याची संधी यानिमित्ताने जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व लोकमत यांनी दिली आहे. त्या संधीचा पुरेपूर फायदा समस्त पालकांनी घ्यावा आणि या कॅम्पला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आयएपी इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स ही भारतातील बालरोगचिकित्सकांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे, जी आरोग्याच्या सुधारणेसाठी आणि बाळांच्या हितासाठी सतत झटत असते.रविवार, २८ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत कांती विसारिया हॉल, आर्य क्रीडा मंडळ बिल्डिंग, गावदेवी मंदिराजवळ, डॉ. बेडेकर हॉस्पिटलसमोर, महर्षी कर्वे रोड, ठाणे (प.) येथे आयोजित हेल्थ कॅम्पमध्ये ० ते ५ वयोगटांतील बाळाच्या आरोग्याची तपासणी तसेच पालनपोषणाविषयी पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. बाळाच्या उज्ज्वल निरोगी भविष्यासाठी राबवल्या जाणाऱ्या शिबिराचे उद्घाटन आयएपी ठाणे अध्यक्ष डॉ. राम गुंडाळे, सचिव डॉ. प्रशांत दरंदले यांच्या हस्ते होणार आहे. यात प्रतिकारशक्ती आणि लसीकरण या विषयावर डॉ. सुदेशा बोंदे्र, पालकत्व या विषयावर डॉ. सायली खंडपूर, संतुलित आहाराविषयी डॉ. पारूल शुक्ला मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला आयएपी, ठाणे यांचे सहकार्य लाभले आहे. हे शिबीर विनामूल्य असून जास्तीतजास्त संख्येने पालकांनी या आरोग्य तपासणी शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकमतने केले आहे.