मुंबई : रेल्वेने केलेल्या भाडेवाढीमुळे कोकण रेल्वे प्रवाशांनाही त्याचा फटका बसणार आहे. या भाडेवाढीमुळे प्रत्यक्षात कोकणात जाणा:या पॅसेंजर तसेच मेल आणि एक्सप्रेस गाडय़ांचा प्रवास महागणार आहे. पॅसेंजर ट्रेनच्या तिकिटांत दहा ते पंधरा रुपये आणि मेल-एक्सप्रेस ट्रेनच्या तिकिटांत 35 रुपयांपासून दरवाढ आहे.
प्रत्यक्षात कोकणात जाणा:या मोजक्याच ट्रेन आहेत. गर्दीच्या काळात या ट्रेनला मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. तर याच काळात कोकणातून रेल्वेला भरघोस उत्पन्न मिळते. यंदा रेल्वेने केलेल्या भाडेवाढीमुळे कोकणचा प्रवास महागला आहे. दिवा-सावंतवाडी ट्रेन पॅसेंजर ट्रेनचा प्रवास रत्नागिरीर्पयत 65 रुपयांवरुन 75 रुपये तर प्रत्यक्षात सावंतवाडीर्पयतचा प्रवास 90 रुपयांपासून 105 रुपयांर्पयत गेला आहे. त्याचप्रमाणो दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनचा प्रवासही 70 रुपयांवरुन 80 रुपये एवढा झाला आहे.त्यामुळे एसटीला स्वस्त पर्यात म्हणून पाहिल्या जाणा:या रेल्वेनेही सामान्यांना रडवले आहे. (प्रतिनिधी)
कोकणकन्या आणि दादर-सावंतवाडी राज्यराणी या मेल-एक्सप्रेसचे भाडे असे असेल
सीएसटीपासूनस्लीपर क्लासथर्ड एसीसेकंड एसीफस्र्ट एसी
जुनेनविनजुनेनविनजुनेनविनजुनेनविन
रत्नागिरी22526060569087099014601665
कुडाळ3003408109201160132519502230
कणकवली2853257758801110126518652130
सिंधुदुर्ग2953408009101150131019302205
मडगाव34539092510551335152022552575