मुंबई : ‘नर्मदा वाचवा’ आणि ‘शेतकरी वाचवा’ अशी हाक देत, ‘नर्मदा बचाव’ आंदोलन संघटनेने नर्मदा खोऱ्यापासून भोपाळपर्यंत लाँग मार्चची हाक दिली आहे. या जनआंदोलनाची सुरुवात आज २९ मे रोजी होणार असून, ४ जून रोजी भोपाळमध्ये लोक न्यायालयाने लाँग मार्चची सांगता होईल.गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यांतील महत्त्वाच्या जिल्ह्यांत सभा घेत, हा लाँग मार्च कूच करणार आहे. २९ मे रोजी खलघाटमध्ये सर्व आंदोलक जमा होतील व एक जाहीर सभा होईल. त्यानंतर, ३० मे रोजी धामनोद आणि गुजरीमध्ये आमसभा होतील. या आमसभांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महू येथील जन्मस्थळी विजयाचा संकल्प करून करून आंदोलक पीथमपूरमध्ये मुक्काम करतील. ३१ मे रोजी पीथमपूरमधून निघालेले आंदोलक इंदौरमध्ये चौकसभा घेत, नर्मदा नियंत्रण प्राधिकरण कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करेल. सायंकाळी येथील जवाहर चौकामध्ये सभा घेतल्यानंतर विश्रांती घेण्यात येईल.१ जून रोजी आष्टासह नजीकच्या गावांमध्ये चौकसभा घेत सीहोरमध्ये आंदोलक जमतील. सीहोरपासून २ जूनला लाँग मार्चच्या रूपात सर्व शेतकरी व आंदोलक नर्मदा वाचविण्यासाठी घोषणा देत फंदा येथे पोहोचतील. ३ जून रोजी फंदा येथील गावागावात सभा घेतल्या जातील, तर ४ जूनला या लाँग मार्चची सांगता नीलम पार्क येथे दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान होणाºया लोक न्यायालयाने होईल.काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?नर्मदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे १०० टक्के पुनर्वसन करा.पुनर्वसनातील भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करा.सरदार सरोवरासह बर्गी, इंदिरा सागर, ओंकारेश्वर या अन्य जलाशयांवर अवलंबून असलेल्या मच्छीमारांना योग्य मोबदला द्या.ज्या शेतकºयांच्या जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत, त्यांना कसण्यायोग्य जमिनी किंवा उपजीविकेचे योग्य साधन द्या.शेतमजुरांचे नियमानुसार पुनर्वसन करा.
‘नर्मदा बचाव’साठी संघर्ष यात्रा, आजपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 6:49 AM