मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षाकडून सातत्याने टीका होताना दिसत आहे. भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आक्रमकपणे सरकारच्या निर्णय, धोरणांवर निशाणा साधत आहेत. मात्र, आता एका ज्येष्ठ माजी आयपीएस अधिकाऱ्याने देवेंद्र फडणवीस यांची कानउघडी केली असून, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ असल्यामुळे चुकीची पावले टाकत आहेत, असा दावा केला आहे. (julio ribeiro criticised devendra fadnavis over various issues)
देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. माजी मुख्यमंत्री, आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कार्यकाळात गृहमंत्री म्हणून लागू केलेल्या कायद्याचा भंग करू नये, अशा शब्दांत माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेलो यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. एका वृत्तपत्रात रिबेलो यांनी यासंदर्भात लेख लिहिला आहे.
“तेव्हाच म्हणालो होतो, अनिल देशमुखांवर कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट”
सगळ्या गोष्टी फडणवीस यांच्या पदाला साजेशा नाहीत
रेमडेसिव्हीर इंजेक्शन तुटवड्या ब्रूक फार्मा कंपनीच्या संचालकांना जेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी आणले, त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे रात्री उशिरा पोलीस स्टेशनला गेले. राज्याच्या सुव्यवस्थेचे आणि कायद्याचे प्रतिक असलेल्या पोलीस ठाण्यात जाणे, त्याठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालणे, अधिकाऱ्यांची चढ्या आवाजात बोलणे या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या पदाला साजेशा नव्हत्या. फडणवीस यांनी त्यांचा संयम गमावला, असेही रिबेलो यांनी म्हटले आहे.
“पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत”
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नियमभंग
ब्रूक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ते गृहमंत्री असताना केलेला नियमच मोडीत काढला. खरंतर रेमडेसिवीर इंजेक्शन कोणाला वैयक्तिक किंवा संघटनांना मिळत नाही. कोरोना संकटात केवळ राज्य सरकारलाच फॅक्टरीतून इंजेक्शन वितरकांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. मात्र, तरीही ब्रूक फार्माच्या पाच वेगवेगळ्या गोदामांमध्ये इंजेक्शन्सचा साठा कसा आढळून आला, हा स्वतंत्र चौकशीचा विषय आहे, असा संशय रिबेलो यांनी व्यक्त केला आहे.
“आम्ही रुग्णवाहिका पाठवतो”; पाकिस्तानाचा भारताला मदतीचा हात, PM मोदींना पत्र
देवेंद्र फडणवीस उतावीळपणा करताहेत
भाजप महाविकासआघाडी सरकारवर कुरघोडी करण्यासाठी टोकाला जाताना दिसत आहे. सुशांत सिंह प्रकरणात भाजपचा हा प्रयत्न फसला. सचिन वाझे प्रकरणात भाजप काहीप्रमाणात यशस्वी ठरली. आतादेखील भाजपने तेच करण्याचा प्रयत्न केला. सध्या लोकांच्या डोक्यात कोरोनाचा विषय आहे. रेमडेसिविरचे प्रकरण एका मर्यादेपलीकडे ताणून धरणे मूर्खपणाचे आहे. लोकांना हा प्रकार फारसा रुचणारही नाही, असेही रिबेरो यांनी म्हटले आहे.