शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

जुलै कोरडा; आता मदार पुढच्या दोन महिन्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 6:21 AM

राज्यातल्या सहा जिल्ह्यांत उणे पावसाची नोंद; मुंबईकरांवर ओढवलेले पाणीकपातीचे संकट गहिरे होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तर भारत, महाराष्ट्रातील काही भाग वगळता मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी पावसाचा जुलै महिना तसा कोरडाच गेला. परिणामी आता आॅगस्ट आणि सप्टेंबर असे पावसाचे दोन महिने अत्यंत महत्त्वाचे असून, या दोन महिन्यांत पुरेसा पाऊस झाला नाही तर मात्र मुंबईकरांवर ओढावलेले पाणी कपातीचे संकट आणखी गहिरे होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, मुंबईत जुलै महिन्यात मान्सून फार सक्रिय नव्हता. देशभरात मात्र तो बऱ्यापैकी सक्रिय होता. बिहारसह आसाममध्ये पूरसदृश स्थितीदेखील निर्माण झाली होती. महाराष्ट्राचा विचार करता मराठवाड्यात आणि विदर्भ येथे चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांसाठी हे सुचिन्ह आहे. कोकणात पन्नास टक्के पावसाची नोंद झाली असली तरी राज्यासाठी एवढा पाऊस पुरेसा नाही.

आॅगस्टच्या सुरुवातीपासून हवामानात बदल होतील आणि उत्तर कोकणासह दक्षिण कोकणात पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तो खरा ठरला तरच मुंबईकरांना दिलासा मिळेल. दरम्यान, येत्या सहा ते सात दिवसांत राज्याच्या पश्चिम किनारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली.१ जूनपासून आतापर्यंतचा पाऊस :च्पालघरमध्ये उणे २७ टक्के पावसाची नोंद झाली. सर्वसाधारण येथे १ हजार २६२.३ मिमी. पावसाची नोंद होते. मात्र सद्य:स्थितीमध्ये ९२० मिमी. पाऊस नोंदविण्यात आला.च्याखालोखाल सातारा, नंदुरबार, अकोला, गोंदिया आणि गडचिरोली येथेही उणे पाऊस नोंदविण्यात आला.अशी झाली नोंद : सोलापूर, अहमदनगर, बीड, औरंगाबाद या चार जिल्ह्यांत ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि वाशिम जिल्ह्यात ५९ टक्क्यांपर्यंत, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा येथे १९ टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली.उणे पावसाची नोंदपालघर-२७, सातारा-२६, नंदुरबार-३३, अकोला-२१, गोंदिया-४३, गडचिरोली-२२ (उणे म्हणजे कमी पाऊस.) आकडे नोंद टक्केवारीत.

टॅग्स :Rainपाऊस