अशोक खरात खोडद : बिबट्यांच्या हल्ल्यामुळे एके काळी भयभीत झालेले जुन्नर तालुक्यातील नागरिक आता बिबट्यासोबत हळूहळू सहजीवनाचे धडे गिरवताना दिसू लागले आहेत. आज समस्या वाटणारा बिबट्या उद्या जुन्नर पर्यटनाचा मुख्य पर्यटनदूत होईल हे लक्षात आल्याने दहशतीपेक्षा सजगतेतून निर्माण होणारी सोबतीची भावना वाढत आहे.एरवी बिबट्याला घाबरणारा जुन्नरकर आता बिबट्याविषयी साक्षर झालाय. मागील वर्षी वन विभाग जुन्नर, एसओएस संस्थेच्या माध्यमातून चालणारे बिबट्या निवारा केंद्र आणि जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या एकत्रित प्रयत्नांतून ‘पर्यावरण साक्षरता कार्यशाळा’ गावोगावी घेण्यात आल्या होत्या. कार्यशाळेच्या माध्यमातून गावकºयांना बिबट्याविषयी सजग करण्यात आले. लोक बिबट्याला सरावले. मानव-बिबट्या संघर्ष राहीलच; पण त्याकडे साक्षर आणि सकारात्मक दृष्टीने बघत जर एकमेकांना जागा दिली, तर एकत्रितपणे राहता येते हा विचार रुजत असल्याचे चित्र दिसत आहे.जुन्नर तालुक्यात ५ धरणांमध्ये पाणी अडवले जाऊ लागले. एके काळी कोरडवाहू म्हणून गणला गेलेला जुन्नरचा पूर्व आणि मैदानी पट्टा आता बाराही महिने हिरवा दिसू लागला. कमी मेहनतीतले आणि हमखास परतावा देणारे पीक म्हणून उसाची शेती बहरली. उसाने समृद्धी आणली आणि त्याचसोबत नकळतपणे बिबट्यादेखील आला. मग हाच मांजरकुळातील बिबट्या निवाºयासाठी वस्तीजवळ उसात येऊ लागला. बिबट्यांकडून होणारे हल्ले, रात्री किंवा अगदी भरदिवसा होणारे बिबट्याचे दर्शन यामुळे बिबट्याच्या वास्तवाची जुन्नरकरांना सवयच झाली आहे.जुन्नरच्या शेतीपूरक अर्थव्यवस्थेला एक पर्याय म्हणून पर्यटन समोर येत असताना बिबट्या त्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, ही बाब प्रकर्षाने लोकांना जाणवत आहे. बिबट्या हा निशाचर आणि मार्जर म्हणजेच मांजर कुळातील प्राणी आहे. बिबट्याच्या मादीची ९० ते १०५ दिवस गर्भधारणा असते. ही मादी एका वेळी १ ते ४ पिलांना जन्म देते. बहुतांशी यातील २ पिले जगतात. ही पिले २ वर्षांची होईपर्यंत मादी त्यांचा सांभाळ करते, अशी माहिती माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी दिली.बिबट्या सफारी विधायक पाऊलवाढत्या लोकसंख्येला व शेतीतील अनिश्चिततेला एक सशक्त पर्याय म्हणून याच उपलब्ध वारशाच्या मदतीने पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती शक्य आहे. सध्या थोड्या प्रमाणात पर्यटन वाढीसही लागले आहे; पण दूरदृष्टी ठेवून पर्यटनातून शाश्वत समाजविकास साधायचा असेल, तर जबाबदार पर्यटन करण्याशिवाय पर्याय नाही. जुन्नरमध्ये होऊ घातलेली बिबट्या सफारी हा त्याचाच परिपाक आहे.- मनोज हाडवळे,अध्यक्ष, जुन्नर पर्यटन विकास संस्थासाकारावे बिबट्यांचे गावसर्वाधिक बिबटे जुन्नर तालुक्यात आहेत. पूर्वी पर्वतरांगांत आणि जंगलात राहणारा हा बिबट्या जंगल कमी झाल्यामुळे मानवी वस्त्यांजवळ उसाच्या शेतात राहू लागला आणि उसाची शेती हेच त्याच जंगल बनले. बिबट्याच्या वास्तव्यामुळे जुन्नरच्या पर्यटनात भर पडली आहे. एखाद्या गावात ‘बिबट्याचे गाव’ ही संकल्पना सुरू केल्यास बाहेरून येणाºया पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.- अर्जुन म्हसे, उपवनसंरक्षक, जुन्नर विभाग९० ते १०५दिवस बिबट्याच्या मादीची गर्भधारणा असते०१ ते ०४पिलांना एका वेळी देते जन्म०२ पिलेजगतात०२ वर्षांची होईपर्यंतमादीकरतेयसांभाळ
जुन्नरकरांना बिबट्या देतोय सहजीवनाचे धडे! लोकांची बदलतेय मानसिकता, पर्यावरण व पर्यटनप्रेमींना आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 6:05 AM