मुंबई : म्हातारपणी एकाकी जीवन जगणा:या ज्येष्ठ नागरिकांचा आधार बनण्यासाठी पालिकेने धोरण जाहीर केल़े मात्र, हे धोरण तयार होऊन वर्ष उलटले तरी अद्यापही ते धोरण ‘अधांतरी’ असल्याचे समोर आले आह़े त्यामुळे या धोरणाची घोषणाबाजी करून प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत़
दारिद्रयरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांवर पालिका रुग्णालयांत विनामूल्य शस्त्रक्रिया, करमणुकीस विरंगुळा केंद्र, आरोग्य सेवेकरिता विशेष हेल्पलाइन अशी स्वप्ने या धोरणातून दाखवण्यात आली होती़ या धोरणाला ऑगस्ट 2क्13 मध्ये पालिका महासभेची मंजुरी मिळाली होती़ मात्र, वर्ष उलटले तरी अद्याप या धोरणाच्या अंमलबजावणीच्या दिशेने प्रशासनाने कोणतीच पावले उचलली नाहीत़
ज्येष्ठांचे प्रश्न सोडवण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीही अद्याप स्थापन करण्यात आलेली नाही़ नागपूर आणि पुणो महापालिकांतूनही या धोरणाची प्रत मागवण्यात आली असताना मुंबई महापालिका प्रशासनाची ही उदासीनता खेदजनक असल्याचे मत शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार यांनी व्यक्त केल़े (प्रतिनिधी)
मनोरंजन : प्रत्येक विभागात 5क्क् चौरस फुटांचे विरंगुळा केंद्ऱ या केंद्रासाठी प्रभाग समितीचा निधी वापरण्यात येईल़ या केंद्रामध्ये विविध मनोरंजनाची साधने उपलब्ध केली जाणार आहेत़ यामध्ये योगसाधना, ब्रिज, सुडुको, बुद्धिबळ आदींचा समावेश असेल़
सांस्कृतिक कार्यक्रम
विविध विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध सणांचे आयोजन, व्यावसायिक उपक्रमांचे आयोजन, नाटय़गृह मोफत, विविध समारंभांकरिता मदत, स्वच्छतागृहांमध्ये रॅम्प व रेलिंग्जची सोय, विविध शाळांमध्ये व सभागृहांमध्ये कार्यक्रमांसाठी प्राधान्य असणार आह़े
आरोग्य : पालिका रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या उपचाराला प्राधान्य दिले जाणार आह़े त्यानुसार केईएम, सायन व नायर या प्रमुख रुग्णालयांमध्ये तसेच 16 उपनगरीय रुग्णालयांत हेल्प डेस्क तयार करण्यात येणार आह़े तसेच साप्ताहिक जेरियट्रिक बाह्यरुग्ण कक्षही चालवले जाणार आहेत़ यामध्ये सर्व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असणार आहेत़
1991 मध्ये 6क् वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 5क् दशलक्ष होती़ 2क्2क् साली ही संख्या 141 दशलक्ष एवढी होईल़
मुंबईतील 6क् वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 12 लाख आह़े यापैकी 21 टक्क्यांहून जास्त ज्येष्ठ दारिद्रय़रेषेखालील आहेत़