शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिका घोटाळा

By admin | Published: May 22, 2016 4:16 AM

देशातील प्रमुख विद्यापीठांमध्ये गणना होणाऱ्या मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकी शाखेतील उत्तरपत्रिका घोटाळा उघडकीस आला आहे. न सोडवलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी परीक्षा विभागाच्या

मुंबई : देशातील प्रमुख विद्यापीठांमध्ये गणना होणाऱ्या मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकी शाखेतील उत्तरपत्रिका घोटाळा उघडकीस आला आहे. न सोडवलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी परीक्षा विभागाच्या ताब्यातील उत्तरपत्रिका पुन्हा विद्यार्थ्यांना घरी दिल्या जात होत्या व त्यासाठी प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी १५ ते २० हजार रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार भांडुप पोलिसांनी शनिवारी उघडकीस आणला. या प्रकरणी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील तिघा क्लार्कसह आठ जणांना अटक करण्यात आली असून अनेक वर्षांपासून हे रॅकेट सुरू असल्याचे समजते. यात विद्यापीठातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. यामध्ये अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षेनंतर काही कर्मचारी विद्यार्थ्यांना त्याच रात्री या उत्तरपत्रिका पुन्हा देत होते. विद्यार्थी घरी जाऊन राहिलेले प्रश्न सोडवून दुसऱ्या दिवशी पुन्हा या उत्तरपत्रिका कर्मचाऱ्यांकडे जमा करत होते. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून सरासरी १५ ते २० हजार रुपये घेतले जात होते. या प्रकरणी विद्यापीठातील लिपिक सिद्धेश जाधव (वय २६), रोहन मोरे (२५), संदीप जाधव (२८), शिपाई मिथुन मोरे (२८), चिमण सोलंकी (४१), संजय कुंभार (४२), दिनकर म्हात्रे (३४) आणि सुरक्षारक्षक प्रभाकर वझे (५०) यांना अटक करून त्यांच्याकडून गणित विषयाच्या तब्बल ९२ उत्तरपत्रिका जप्त केल्या आहेत, असे परिमंडळ-सहाचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी सांगितले.चार दिवसांपूर्वी काही जण विद्यापीठातून उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना घरी देत असल्याबाबत बोलत असल्याचे भांडुप पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रमेश यादव यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही बाब वरिष्ठांना सांगितली. भांडुप परिसरातील मनोज शिंगाडे या विद्यार्थ्याने काही उत्तरपत्रिका घरी सोडवण्यासाठी आणल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याकडे ३० पाने असलेली एक उत्तरपत्रिका आढळली. त्याची चौकशी केली असता, यामागील रॅकेट उघडकीस आले. सुरक्षा रक्षकाला सर्वाधिक वाटाविद्यार्थ्यांकडून एका पेपरसाठी हे आरोपी १५ ते २० हजार रुपये घेत होते. त्यातील आठ हजार रुपये हे केवळ ज्या ठिकाणी पेपर ठेवले जातात, तेथील सुरक्षा रक्षक प्रभाकर वझे याला मिळत होते. तो हे पेपर बाहेर काढून इतर सहकाऱ्यांना देत होता. तसेच पेपर लिहून परत आणल्यानंतर हे पेपर पुन्हा त्याच ठिकाणी ठेवण्याचे देखील काम त्याचेच होते. त्यामुळे त्याचा वाटा मोठा होता. त्यानंतर राहिलेली रक्कम इतर वाटून घेत. पोलीस अहवालानंतर कारवाईपेपर रॅकेटप्रकरणी पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर तातडीने परीक्षा मंडळाची बैठक बोलाविली जाईल. संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर रितसर कारवाई केली जाईल, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दीपक वेसावे यांनी सांगितले.