शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

जपू-जोपासू सृष्टीवैविध्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 4:30 AM

निसर्गाचे प्रयोजनच वैविध्यासाठी आहे आणि ते वैविध्य आपल्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहे. वेगवेगळी झाडेवेली, पशुपक्षी सृष्टीचक्र ाच्या निकोप परिचलनासाठी गरजेचे असतात. अन्यथा निसर्गाचा तोल ढळू लागतो आणि त्याचा परिणाम माणसावर होतो. त्यानंतर त्याला साक्षात्कार होतो की, आपण जैवविविधतेमध्ये बाधा आणतोय! निसर्गातली विविधता राखण्याचा साधा विचार वेळीच केला; तर निसर्गाच्या आणि आपल्याही जीवनात बाधा येणार नाही. त्यामुळे वेळीच शहाणं झालेलं बरं...

- कौस्तुभ दरवेसजैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. आपली पृथ्वी त्यावरील परिसंस्थेची, जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी २२ मे २०१३ पासून हा दिवस जगभरात ‘जैवविविधता दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जैवविविधता म्हणजे काय तर रेमंड एफ दासमान या वन्यजीव अभ्यासकाने ‘अ डिफरंट काइंड आॅफ कंट्री’ या पुस्तकामध्ये विविधता टिकवून ठेवण्याच्या संदर्भात जैवविविधता या शब्दाचा प्रथम प्रयोग केला. जैवविविधतेचे महत्त्व याकडे लक्ष दिले असता ज्याप्रमाणे निरोगी जगण्यासाठी आपल्याला रोजच्या आहारात प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्व या सर्वांची गरज असते. कोणत्याही एका घटकाच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. तसेच जैवविविधतेच्या एका घटकाच्या नष्ट होण्यानेही सर्व सृष्टीचा समतोल ढासळू शकतो. जैवविविधतेचे स्वरूप हे अधिवासांवर अवलंबून असते. त्याचप्रकारे सजीव सृष्टीच्या निकोपवाढीसाठी जैवविविधता अत्यंत महत्त्वाची आहे.

जैवविविधता परिसंस्था, प्रजाती आणि जनुकीय अशा तीन पातळ्यांवर असते. गवताळ रानं, जंगलं, खारफुटीची जंगलं इत्यादी म्हणजेच परिसंस्थेची विविधता होय. किडा-मुंगी, वाघ, साप, पक्षी ही आहे जीवांची विविधता. एखाद्या जीवामध्ये/ प्रजातीमध्ये ज्या उपजाती असतात त्याला जनुकीय विविधता म्हटले जाते. जसे, आंब्याच्या तोतापुरी, देवगड हापूस, रायवळ अशा उपजाती आहेत.

अधिवासानुसारच तेथील जीवांची जडणघडण होत असते आणि या जीवांमुळेच अधिवासाचे संतुलनही राखले जाते. या परिसंस्थांना अनुकूल जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागतो. कालौघात एखादी प्रजाती हळूहळू नष्ट होणे हे नैसर्गिक असले तरी गेल्या काही दशकांत सजीवांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या २५ वर्षांत जगातील जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच केले नाही, तर भविष्यात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल.

सजीवांच्या प्रजाती नष्ट होण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे नैसर्गिक अधिवासात झालेली घट. विशेषत: शहरीकरणामुळे जंगलाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नष्ट झाले आहे. त्यामुळे जैवविविधता मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाले आहे.मुंबई शहर आणि परिसरात राणीची बाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर अभयारण्य, मुंबईचे समुद्रकिनारे, शिवडी, ठाणे, ऐरोली खाडी परिसर भांडुप पम्पिंग स्टेशन अशा मोजक्या ठिकाणी जैवविविधता कशीबशी तग धरून आहे.

खाड्यांमध्ये तिवर म्हणजेच ग्रे मॅन्ग्रोव्ह ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते. मेस्वाक नावाचे मॅन्ग्रोव्हदेखील ठाणे खाडीत आढळते. त्याशिवाय रेड मॅन्ग्रोव्ह, व्हाइट मॅन्ग्रोव्ह या त्यातील काही प्रजाती. याच खारफुटीच्या मुळाशी सुरक्षित जागी मासे आपली अंडी घालतात. पूर्वी साधारण १०० पेक्षा अधिक प्रकारचे मासे खाडीत सापडायचे. निवठा, मुगील, तिलापिया, तार्पोन, कॅटफिश इत्यादी. ठाण्याचे पक्षीवैभव राखण्यात या खाडीचा मोठा वाटा आहे. ठाणे खाडीत १५० पेक्षा अधिक प्रकारचे पक्षी आढळतात. यात पाणथळ जागेतील पक्षी आणि स्थलांतरित पक्षी यांचा मोठा वाटा आहे. घार, खंड्या, वेगवेगळ्या प्रकारची बदके, ग्रे हेरॉन, ओस्प्रे, सँडपायपर, कुदल्या, चित्रबलाक, छोटा रोहित, मोठा रोहित, आय्बीस असे अनेक पक्षी येथे आढळतात. मुरबाड आणि शहापूर भागात १९७२ पूर्वी मरळ नावाचा मोठा मासा आढळला. लक्ष्मीकमळ नावाच्या भारतीय कमळाच्या जातीचे अस्तित्वही येथे होते. या क्षेत्रात जांभळी पाडळ, पिवळी पाडळ, खड्गशेंग, करमळ, हुमण, कोरळ, दांडस हे दुर्मीळ वृक्ष आहेत.

(लेखक पर्यावरण विषयाचे अभ्यासकआणि संशोधक आहेत.)