शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

जीवनविद्या मिशनचा गुरुपौर्णिमा सोहळा

By admin | Published: July 15, 2017 3:05 AM

वामनराव पै यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ३ ते ९ जुलैदरम्यान कर्जत येथील जीवनविद्या ज्ञानपीठाच्या पुण्यस्थळी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जीवनविद्या मिशनच्या वतीने सद्गुरू वामनराव पै यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ३ ते ९ जुलैदरम्यान कर्जत येथील जीवनविद्या ज्ञानपीठाच्या पुण्यस्थळी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न झाला. दर दिवशी राज्यातील विविध ठिकाणांहून तीन ते चार हजार नामधारक ज्ञानपीठात येत होते. त्यांची व्यवस्था करण्यासाठी जीवनविद्या मिशनचे युवा नामधारक १५ दिवस अगोदरपासूनच सज्ज झाले होते. संपूर्ण नियोजन शिस्तबद्धरीतीने करण्यात आले. यासाठी सुरक्षा, स्वच्छता, किचन, पार्किंग, आयटी/टेक्निकल, सभागृह व्यवस्था अशा विविध समिती कार्यरत होत्या. सभामंडपात विविध स्टॉल लावण्यात आले होते. त्याद्वारे नामधारकांना अवयवदान अभियान, वृक्षारोपण अभियान, ग्राम समृद्धी अभियान याची माहिती देण्यात येत होती. ‘करावी पूजा मनेची उत्तम... लौकिकाचे तिथे काय काम’ या संत उक्तीवर आधारित वामनराव पै यांनी मानसपूजेची निर्मिती केली. अशी मानसपूजा ज्येष्ठ नामधारक सर्व नामधारकांकडून करून घेत होते. या वेळी शिवाजीराव पालव, शीतल गोरे, संतोष तोत्रे, वंदना बेल्हे, भरत पिंगळे, नामदेव मिरगुले, शंकर बांदकर यांनी मार्गदर्शन केले. प्रल्हाद पै यांनी मानवी संस्कृतीचे संस्कार-समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान आणि कृतज्ञता याविषयी ७ दिवस मार्गदर्शन केले.>प्रथम पारितोषिक जीवनविद्या ज्ञानपीठाला वास्तुरचनेसाठी आणि पर्यावरणाला अनुकूल अशा सुंदर लँडस्केपिंगसाठी ‘दिल्ली आर्किटेक्चर फेस्टिव्हल २०१६’चे प्रथम पारितोषिक मिळाले. हे प्रशंसापत्रक देण्यासाठी वास्तुविद्याविशारद रोहित सिंकरे उपस्थित होते. त्यांनी हे प्रशंसापत्रक प्रल्हाद दादांना सुपुर्द केले.>सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी...सुख, समाधान आणि शांती या गोष्टी पैशाने मिळत नाहीत. त्यासाठी जीवनविद्या मिशनचे समाज उपयुक्त काम प्रेमाने केले पाहिजे. दृष्टी समतेची, कृती सभ्यतेची, वागणूक सामंजस्याची, वृत्ती सहिष्णुतेची, बैठक समाधानाची आणि युक्ती कृतज्ञतेची यालाच युक्तियोग म्हणतात. सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. मानवी संस्कृतीचे हे सहा संस्कार आत्मसात करून तुम्ही तुमचे जीवन सुखी आणि आनंदी करू शकता.- प्रल्हाद वामनराव पैअवयवदानजीवनविद्या मिशनचे सचिव विवेक बावकर यांनी अवयवदान अभियानात, आतापर्यंत ३ हजार अवयवदात्यांनी नोंदणी केल्याची माहिती दिली. अवयवदानाविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनचे अध्यक्ष दिलीप पटवर्धन यांनी अवयवदान म्हणजे जीवनदान या विषयावर मार्गदर्शन केले. वृक्षारोपणदोन लाख वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प जीवनविद्या मिशनने केला आहे. जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै आणि इतर विश्वस्त यांनी कृतज्ञता दिनानिमित्ताने वृक्षारोपण करून लोकांसमोर आदर्श घालून दिला. ६० गावे दत्तक महाराष्ट्र सरकारच्या ग्राहक हक्क संरक्षण जनजागृती चळवळीमध्येही मिशनचा सहभाग जाहीर करण्यात आला. जीवन विद्या मिशनच्या हीरक महोत्सवी वर्षांतर्गत ६० गावे दत्तक घेऊन त्यांचा सर्वोतोपरी विकास करण्याचा निर्णय ग्राम समृद्धी अभियानांतर्गत घेतला होता. त्यांच्या विकासासाठी मिशनने जे योजनाबद्ध नियोजन केले आहे त्याचा तपशील देण्यात आला.बेटी बचाओ बेटी पढाओसद्गुरूंनी स्त्रीला नेहमीच आदराचे स्थान दिले आहे. याची दखल घेत भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानात जीवनविद्या मिशनचा सहभाग आहे, असे या वेळी सांगण्यात आले.