शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

केवळ प्रमाणपत्र घेण्यासाठी दिव्यांगांची होतेय ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 3:52 AM

रूग्णसेवा ही ईश्वरसेवा असे म्हटले जाते. मात्र जिल्हा रूग्णालयात मिळणारी सेवा पाहून जणू येथील कर्मचारी उपकारच करत आहेत अशा थाटात वागत असतात. गरज असल्याने रूग्ण हे सर्व काही निमूटपणे सहन करत असतात. समस्यांशी सामना करत रूग्ण उघड्या डोळ््यांनी हे बघत असतात.

रूग्णसेवा ही ईश्वरसेवा असे म्हटले जाते. मात्र जिल्हा रूग्णालयात मिळणारी सेवा पाहून जणू येथील कर्मचारी उपकारच करत आहेत अशा थाटात वागत असतात. गरज असल्याने रूग्ण हे सर्व काही निमूटपणे सहन करत असतात. समस्यांशी सामना करत रूग्ण उघड्या डोळ््यांनी हे बघत असतात. ज्यांनी आवाज उठवायला हवा त्यांनी तोंडाला पट्टी लावून घेतल्यामुळे न्याय कुणाकडे मागायचा, हा खरा प्रश्न आहे.दिव्यांगाना (अपंगांना) या ठिकाणी प्रमाणपत्र हवे असेल तर त्यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागते. आठवड्यातून केवळ बुधवारीच हे प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे सकाळी सातपासून जिल्ह्याच्या विविध भागातून सुमारे ३५० ते ४०० दिव्यांग हे प्रमाणपत्र घेण्यासाठी रांगा लावून असतात. प्रत्यक्षात केसपेपर घेण्यासाठी त्यांना विशेष रांग असणे आवश्यक आहे. परंतु येथूनच त्यांची तारेवरची कसरत सुरु होते. सकाळी सात वाजता आलेल्या लाभार्थ्यांचा अनेकवेळा संपूर्ण दिवस निघून जातो. त्यांना या ठिकाणी ना बसण्याची ना पाण्याची व्यवस्था. स्वच्छतागृहात जाण्यासाठी तेथे आवश्यक असलेल्या जिन्यांची व्यवस्था नाही. त्यातही ज्या दिवशी ते प्रमाणपत्र घेण्यासाठी येतात, त्याच दिवशी त्यांना ते मिळेल याची शाश्वती देखील नसते.याठिकाणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अनेक दिव्यांग मोठ्या आशेने येत असतात. परंतु, दिवसाला केवळ ७५ ते १०० जणांनाच प्रमाणपत्र दिले जाते. त्यातही मुख्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतील तर त्यांच्या स्वाक्षरीसाठी सायंकाळपर्यंत उपाशीपोटी ताटकळत उभे राहण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नसतो. त्यातही याठिकाणी आॅनलाईन आणि मॅन्युअली अशा दोन्ही पध्दतीने प्रमाणपत्र दिले जाते. परंतु त्यासाठी देखील एकच रांग लावावी लागते. काही वेळेस सर्व्हर डाऊन झाल्याचा फटकाही सहन करावा लागतो. त्यातही सरकारने रेशनकार्ड बंधनकारक केलेले नसतानाही येथे मात्र रेशनकार्ड असेल तरच तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाईल अशी पाटीच लावण्यात आली आहे. येथे अत्याधुनिक सुविधा नसल्याने काही मूक, बधिर रुग्णांना तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवले जाते. त्यानंतर त्यांचा अहवाल आल्यानंतरच प्रमाणपत्र दिले जाते.रिक्ते पदे केव्हा भरणारठाणे जिल्ह्यातील गोरगरीबांचे रूग्णालय म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालय ओळखले जाते. परंतु येथे आवश्यक असलेल्या डॉक्टरांची संख्या कमी आहे. या रु ग्णालयासाठी प्रथम वर्गाची १९ पदे मंजूर आहेत. सध्याच्याघडीला त्यापैकी केवळ ९ पदेच भरण्यात आली असून १० पदे रिक्त आहेत. तर, द्वितीय वर्गाची ३३ पदे मंजूर असून दोन पदे रिक्त असून ३१ पदे भरण्यात आली आहेत. वैद्यकीय अधिकारी आणि दंतचिकित्सक तृतीय वर्गासाठी प्रत्येकी एक पद मंजूर असून ही दोन्ही पदे भरलेली नाहीत. तसेच शुश्रूषा अधिकारी हे पद देखील गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहे. त्या जागेवर असलेल्या अधिकारी या सेवानिवृत्त झाल्या आहेत. तर, सार्वजनिक आरोग्य परिचारिकांची ७ पदे मंजूर असून त्यापैकी ५ पदे भरलेली आहेत. दोन पदे रिक्त आहेत. परिसेविकांची २५ पदे मंजूर असून त्यापैकी २४ पदे भरलेली आहेत.एक पद रिक्त आहे. अधिपरिचारिकाची १२५ पदे मंजूर असून त्यापैकी ११७ पदे भरलेली आहेत. आठ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे रु ग्णालय म्हटले की, त्या ठिकाणी स्वच्छता आली. मात्र, जिल्हा रु ग्णालयात स्वच्छतेबाबत अनागोंदी आहे. स्वच्छता निरीक्षक, आरोग्य सहायक यांची दोन पदे मंजूर असून दोन्हीही पदे रिक्त असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.>व्हेंटिलेटरची संख्या वाढवणे गरजेचेनवजात शिशू विशेष उपचार कक्षात व्हेंटिलेटरच नसल्याची बाब असताना इतर विभागांत केवळ २० च्या आसपासच व्हेंटिलेटर आहे. प्रत्यक्षात रुग्णांची संख्या जास्त असल्याने व्हेंटिलेटरची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे मत येथील तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करत आहेत.>रुग्णालयाची इमारत धोकादायक : जिल्हा रुग्णालयाची इमारत ही १९३६ मधील आहे. या इमारतीची वारंवार डागडुजी करण्यात आल्याने आता या रुग्णालयाची अवस्था फारच दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी स्लॅब निखळले असून, प्लास्टर पडलेले आहे. खिडक्यांची अवस्था नाजूक झाली आहे. शवागराची क्षमता काही प्रमाणात वाढवण्यात आली आहे. पूर्वी ८ ची येथे क्षमता होती, ती आता १६ पर्यंत नेण्यात आली आहे, हीच काय ती जमेची बाजू म्हणावी लागेल. दुसरीकडे मागीलवर्षी येथे एक स्वच्छतागृह तयार करण्यात आले. ते खाजगी संस्थेकडे चालवण्यासाठी देण्यात आल्याने त्याची अवस्था तशी चांगली आहे. परंतु इतर ठिकाणी दुर्गंधी आणि केवळ दुर्गंधीच पसरली आहे.>सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार...केवळ ठाणे शहरच नव्हे, तर संपूर्ण जिल्हा तसेच पालघर जिल्ह्यातील रूग्णांनाही सर्वोच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, यासाठी जिल्हा सर्वसाधारण रूग्णालयाचे (सिव्हिल हॉस्पिटल) रु पांतर सुपर स्पेशालिटी रु ग्णालयात होणार आहे. या ठिकाणी ५५० खाटांचे इंटिग्रेटेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतला आहे. यासाठी १६८ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ठाण्यातील नागरिकांना माफक दरात अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध येथे केल्या जाणार आहेत. रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होण्याकरिता ३ ते ४ वर्षाचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा रु ग्णालयाचे कामगार रु ग्णालय येथे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. याठिकाणी ४५० नियमित आणि १०० सुपर स्पेशालिटी असे एकूण ५५० वाढीव खाटांचे असे हे रु ग्णालय असणार आहे.>न्यूरोसर्जनच नाही... : विविध प्रकारच्या अपघातांत जखमी झालेल्या रुग्णांची संख्या येथे अधिक असते. परंतु, डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्यास तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज भासते. परंतु, जिल्हा रुग्णालयात न्यूरोसर्जनच नसल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांकडे अथवा थेट मुंबईला धाव घ्यावी लागते. अशा वेळी, रुग्ण दगावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे तातडीने न्यूरोसर्जन नियुक्त करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात सरकारकडे पत्रव्यवहारही करण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु, अद्यापही त्यावर ठोस अशी पावले उचलण्यात आलेली नाहीत.>खाटाही पडतात कमीरुग्णांना तपासण्यासाठी असलेल्या वॉर्डातदेखील फारशा सुविधा नाहीत. या रुग्णालयात २५० च्या आसपास खाटा आहेत. सध्या काही ठिकाणच्या खाटा जरी रिकाम्या दिसत असल्या, तरी प्रत्यक्षात उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या ही काही वेळेस ३५० च्या वर जाते. एखादी साथ जर आली, तर मात्र या ठिकाणी उपलब्ध असलेल्या खाटाही कमी पडतात. त्यामुळे काही वेळेस खालच्या बाजूलादेखील बेड लावले जातात. त्यातही मिळणारे बेड चांगले, उत्तम असे जरी वाटत असले तरी ते चुकीचे आहे. या बेड्सवरील चादरींचा दुर्गंध एवढा असतो की, रुग्ण त्यानेच हैराण होऊन जातो. विशेष म्हणजे या विभागात काम करणाºया परिचारिकाही कशा काम करतात, याचा विचार न केलेलाच बरा. त्यातही जनरल वॉर्ड असल्याने रुग्ण कशाही पद्धतीने झोपलेले असतात. त्यातही उपचारासाठी येणारे डॉक्टरही आजूबाजूला कोण आहे, याची खबरदारी न घेताच उपचार करतात.>वेटिंग रूमच नाहीरुग्णालयात जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यातूनही गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. उपचारासाठी दाखल होणाºया रुग्णांची संख्या २०० च्या आसपास आहे. परंतु, जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाºया रुग्णांसाठी येथे चांगली सुविधा तर नाहीच, शिवाय त्यांच्या नातेवाइकांचे तर येथे हालच होतात. त्यांच्यासाठी वेटिंग रूम नसल्याने दिवसरात्र रुग्णालयाचा कोणता तरी कोपरा पकडून ही मंडळी वास्तव्य करताना दिसतात. दिवसाच्या वेळेस तर जिथे जागा मिळेल, त्या ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक बसलेले अथवा झोपलेले असतात. त्यामुळे किमान लांबून येणाºया रुग्णांच्या नातेवाइकांसाठी एखादी वेटिंग रूम द्यावी, अशी माफक अपेक्षा रुग्णांच्या नातेवाइकांकडून व्यक्त केली जात आहे. केवळ वेटिंग रूमच नाही, तर जेवणाची सोयदेखील रुग्णालयाकडून उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेर जाऊन हॉटेलचा आसरा घ्यावा लागतो.>सीटी स्कॅन यंत्रणा बंदरुग्णांसाठी सीटी स्कॅनची सोय व्हावी, यासाठी सुमारे दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी सीटी स्कॅनची यंत्रणा सुरू करण्यात आली. त्याचा फायदा अनेक रुग्णांना झाला, परंतु मागील वर्षभरापासून ही यंत्रणाच बंद असल्याची माहिती समोर आली आहे. ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले, तरी त्यांना यात अद्याप यश आलेले नाही.>डिजिटल एक्स रे यंत्रणेची गरजएकीकडे ठाणे शहर स्मार्ट सिटीकडे जात असताना आणि सर्वच यंत्रणा डिजिटल होत असताना जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत काहीसे मागेच असल्याचे दिसत आहे.येथील एका इमारतीत नव्याने एक्स रेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे येथील रूम चकाचक करण्यात आल्या आहे. परंतु, या ठिकाणी जुनीच एक्स रे मशीन बसवण्यात आली आहे.प्रत्यक्षात आजच्या घडीला डिजिटल एक्स रे मशीनची गरज असून एखाद्या रुग्णाला जास्तीचा मार लागला असेल किंवा काही इजा झाली असेल ती