शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

आचारसंहिताभंगाची कारवाई नावापुरतीच

By admin | Published: January 18, 2017 1:24 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आचारसंहिता लागू झाल्या असताना पुणे शहरात काही विकासकामांची उद्घाटने केली

पुणे : राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी आचारसंहिता लागू झाल्या असताना पुणे शहरात काही विकासकामांची उद्घाटने केली, काही नेत्यांनी आचारसंहितेचा भंग करून सरकारी इमारतीमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, आचारसंहितेमध्ये कोणतीही परवानगी न घेता नेत्याच्या वाढदिवसांचे जाहीर कार्यक्रम घेणे... आचारसंहिताभंगाच्या यासारख्या अनेक गंभीर तक्रारी असतानादेखील एकाही प्रकरणामध्ये प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.केंद्रीय निवडणूक आयोग असो की राज्य निवडणूक आयोग कोणत्याही स्वरुपाच्या निवडणुका जाहीर केल्यावर त्या-त्या भागात आचारसंहिता लागू करते व अत्यंत कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले जातात. परंतु फ्लॅक्स, बॅनर काढून या कारवाईची मोठी आकाडेवारी देण्यापुरतीच निवडणूक प्रशासनाची कारवाई राहते. निवडणुकीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात परस्परविरोधी आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी दाखल होतात. या तक्रारी नंतर काही प्रकरणांमध्ये पोलिसांमध्ये गुन्हे दाखल केले जातातदेखील, मात्र अंतिम स्वरुपात कोणत्याही ठोस कारवाई होत असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. >विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात २०९ प्रकरणांमध्ये आचारसंहिता भंग करण्यात आल्याची तक्रार दाखल झाल्या होत्या. त्यापैकी केवळ २३ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु निवडणूक झाल्यानंतर या तक्रारीचेदेखील पुढे काहीच झाले नाही. लोकसभा निवडणुकीतदेखील सुमारे १२० आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. पण या तक्रारीमध्येदेखील पुढे काहीच झाले नाही. यामुळे निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून केवळ आचारसंहितेचा नावापुरताच कांगावा केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.