- नामदेव पाषाणकर, घोडबंदरदर वर्षाच्या बुद्ध पौर्णिमेला जंगलात प्राण्यांची जनगणना केली जाते. यात मानवी वस्त्यांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील काही प्राण्यांच्या आकडेवारीत घट होत असल्याचे समोर येत आहे. येऊर परिसरात २०१० मध्ये एकूण २५८ प्राण्यांची मोजदाद झाली होती. २०१५ मध्ये हा आकडा ३८८ वर पोहचला आहे. या पाच वर्षात प्राण्यांची संख्या १३० ने वाढली. मात्र वानर,भेकर,ससे यांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे.येऊर परिसर जवळपास १५ हजार एकर जागेत विस्तारला आहे. यामध्ये पाचपाखाडी, कावेसर, मानपाडा, ओवळा, घोडबंदर, चेना, काशी, ससुनघर, नागला, सारजामोरी हा विभाग येत आहे. नैसिर्गक असलेल्या १५ पाणवठ्यांवर आणि ज्या जागेवर प्राणी येण्याची शक्यता असते तिथे पहारा देऊन वन कर्मचारी त्यांची गणती करतात. ती करताना सर्वच प्राणी त्या रात्री आढळतात, असे नाही. त्यामुळेच प्राप्त झालेल्या आकडेवारीत बराचसा फरक आढळत आहे. २०१० मध्ये वानर १०१, ससे २४, माकडे ४८, रानडुकर १६, सांबर १५, भेकर १३, मोर १५, उदमांजर १, रानमांजर १, बिबटे १० असे एकूण ३८८ प्राणी दिसून आले होते.2013-14 या आर्थिक वर्षात सस्तन प्राणी ४३, सरपटणारे प्राणी ३८, उभयचर प्राणी ९, पक्षी २५० असे एकूण ३४० प्राणी आढळले होते. २०१५ मध्ये झालेल्या गणनेत बिबटे २, वानर ६२, माकड १७१ , रानडुक्कर १५ सांबर १५, ,भेकर ३,मोर १, उदमांजर २, रानकोंबडी २९ ,रानमांजर ३,वटवाघुळ ३८, मुंगुस २२, चितळ २१, कोल्हे २, सर्प गरु ड २ अशा एकूण ३८८ प्राण्यांची आकडेवारी नोंद आहे. २०१५ च्या या गणनेत बिबटे कमी असल्याचे आढळले असले तरी ते कमी झाले नसून त्यांची संख्या वाढली असल्याचे वन अधिकारी संजय वाघमोडे यांनी सांगितले. उद्यानात जवळपास ५० च्या आसपास बिबटे असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
पाच वर्षांत केवळ १३० प्राण्यांची वाढ
By admin | Published: September 09, 2015 12:57 AM