मोरगाव : गुप्तधन व गेलेली संपत्ती परत मिळविण्यासाठी बारामती तालुक्यातील अल्पवयीन मुलीची अघोरी पूजेसाठी मागणी करणाऱ्यांचा पर्दाफाश तिच्या आई-वडिलांनी दाखविलेल्या धाडसामुळे झाला. मात्र, या प्रकरणाचा सुरुवातीपासून ‘लोकमत’ने पाठपुरावा केला. त्यामुळे मुख्य आरोपीसह त्यामध्ये सहभागी मांत्रिक व इतरांवर कारवाई झाली. लोकमतच्या पाठपुराव्याचे कौतुक केले जात आहे. अघोरी पूजेबाबत २५ मे रोजी अल्पवयीन मुलीची गुप्तधनासाठी मागणी मांत्रिकाविरोधात तक्रार दाखल या मथळ्याखाली ‘लोकमत’ने हे वृत्त प्रसिद्ध करून या घटनेला प्रथम वाचा फोडली. त्यानंतर सातत्याने या घटनेचा पाठपुरावा केला. या प्रकरणातील सूत्रधाराचे धागेदोरे कर्नाटकापर्यंत पोहोचले होते. सर्व आरोपींना अटक होईपर्यंत लोकमतने पाठपुरावा केला. दि. ३० मे रोजी- गुप्तधन प्रकरणी आज जामिनावर सुनावणी, ३१ मे रोजी- १४ दिवसांची आरोपींना न्यायालयीन कोठडी, जैनच्या अर्जावर १३ रोजी सुनावणी, अशा बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.
गुप्तधन प्रकरणाला ‘लोकमत’मुळेच न्याय
By admin | Published: June 11, 2016 1:14 AM