वाई (सातारा) : वाई हत्याकांडातील मंगल जेधे खून प्रकरणात अटकेत असलेल्या ज्योती मांढरे हिच्या पोलीस कोठडीत शुक्रवारी सात दिवसांची वाढ करण्यात आली. सलमा शेख हिच्या खूनप्रकरणी ज्योतीची चौकशी करण्यात येणार आहे.पोलिसांनी पुन्हा ज्योतीला सातारा येथील कारागृहात वर्ग करून तिची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर तिला शुक्रवारी वाई न्यायालयासमोर हजर केले. संतोष पोळ आणि ज्योती मांढरे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी, त्यामुळे कोणीतरी त्यांचे वकीलपत्र घ्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, वकील संघटनेने त्यांचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही, असा युक्तिवाद पोळ हा न्यायालयात करू शकतो.त्याला त्याची बाजू मांडण्याचीसंधी मिळावी म्हणून भारती कोरवार यांनी शुक्रवारी न्यायालयात वकीलपत्र दाखल केले. न्यायालयाच्या आदेशावरून कोरवार या पोळ याची बाजू मांडणार आहेत. त्या विधि सेवा समितीच्या सदस्या आहेत. (प्रतिनिधी)पोळला आज हजर करणारसंतोष पोळलाही साताऱ्यातील कारागृहात वर्ग करून त्याला पुन्हा सलमा शेख खून प्रकरणात शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्याचीही कोठडी मिळविण्यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत.
ज्योती मांढरेला सात दिवसांची कोठडी
By admin | Published: August 27, 2016 4:49 AM